S M L

व्यापाऱ्यांनी सोयाबीनचे दर पाडले; शेतकऱ्यांची लूट!

आधीच सोयाबीनचं उत्पादन 60 टक्क्यांपर्यंत घटलेलं असताना, बाजारात सोयाबीनचे दर पाडून व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची लूट सुरू केलीय

Updated On: Oct 12, 2018 05:56 PM IST

व्यापाऱ्यांनी सोयाबीनचे दर पाडले; शेतकऱ्यांची लूट!

नितीन बनसोडे, लातूर, 12 ऑक्टोबर - आधीच सोयाबीनचं उत्पादन 60 टक्क्यांपर्यंत घटलेलं असताना, बाजारात सोयाबीनचे दर पाडून व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची लूट सुरू केलीय. अद्याप सरकारनेही सोयाबीन खरेदी करण्यासंदर्भात कोणत्याच हालचाल केल्या नसल्याने व्यापारी निर्ढावले असल्याचे दिसून येत आहे. तर रब्बीच्या पेरण्यांचा कालावधी जवळ आला असून, त्यासाठीचा खर्च कसा उभा करावा या विवंचनेत असलेल्या शेतकऱ्यांना आपलं सोयाबीन कमी दरानंच विकावं लागतंय.

लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार पेठेत शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेल्या सोयाबीनचा लिलाव करण्यासाठी व्यापाऱ्यांनी अक्षरशः गर्दी केली आहे. सोयाबीनचा लिलाव सद्या ऑनलाईन पद्धतीनेच होत असल्यामुळे येथे जमा झालेल्या प्रत्येक व्यापाऱ्यांच्या हातात मोबाईल दिसून येत आहे. सरकारनं सोयाबीनला प्रति क्विंटल 3399 रुपये इतका हमीभाव ठरवून दिला असला तरी, प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या सोयाबीनला 2700 ते 3000 रुपयापर्यंतच भाव मिळतोय. त्यातही सोयाबीनच्या दाण्यातली आर्द्रता बाजूला काढून भाव दिला जात असल्यामुळे, प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या हातात केवळ 2500 रुपयेच पडतायत. तर अनेक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नाहीए. त्यामुळं राज्य सरकारनं तातडीनं जागं होऊन सोयाबीनचे हमीभाव केंद्र सुरु करावेत अशी मागणी शेतकऱी करतायत.

सध्या लातूरच्या बाजारात सोयाबीनची आवक मंदावलीय. गतवर्षीच्या तुलनेत यंदा निम्म्याहून अधिक आवक कमी झालीय. सध्या बाजारात १० ते १५ हजार क्विंटल एवढीच आवक आहे. गेल्यावर्षी याच काळात ही आवक ७० ते ८० हजार क्विंटल पर्यंत होती.लातूर बाजार समितीच्या आवारात दररोज सोयाबीनची होणारी जेमतेम 10 हजार क्विंटलची आवक व्यापाऱ्यांनाच नव्हे तर बाजारतज्ज्ञांनाही विचार करायला लावणारी आहे. उत्पादनात 60 टक्क्यांपेक्षा जास्त घट झाली असल्यानं शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी थोडा धीर धरणंच गरजेचं झालंय.

 VIDEO : कुठली मालिका आहे नंबर वन? #TRPमीटर काय सांगतोय बघा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 12, 2018 05:56 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close