मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

कुलगाममध्ये दोन ठिकाणी चकमकी; एका तासात 5 दहशतवादी ठार; सुरक्षा दलाचं यश

कुलगाममध्ये दोन ठिकाणी चकमकी; एका तासात 5 दहशतवादी ठार; सुरक्षा दलाचं यश

प्रतिकात्मक छायाचित्र

प्रतिकात्मक छायाचित्र

Jammu Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu Kashmir)सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा खात्मा करण्यास सुरुवात केली आहे.

  • Published by:  Pooja Vichare

श्रीनगर, 18 नोव्हेंबर: जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu Kashmir)सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा खात्मा करण्यास सुरुवात केली आहे. त्यातच काल दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलांना कुलगाम (Kulgam) जिल्ह्यात मोठं यश मिळालं आहे. येथे सुरक्षा दलांनी अवघ्या 1 तासात 5 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.

जम्मू-काश्मीर पोलिसांच्या काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दलांना मोठं यश मिळालं आहे. बुधवारी तासाभरात सुरक्षा दलांनी दोन चकमकीत 5 दहशतवाद्यांना ठार केले.

काश्मीरचे आयजी विजय कुमार यांनी सांगितलं की, सुरक्षा दलांनी पोमबई आणि गोपालपुरा गावात झालेल्या चकमकीत या दहशतवाद्यांना ठार केलं आहे. सध्या दोन्ही ठिकाणी चकमक सुरू असून सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आहे.

पोलिसांनी जारी केलेल्या अधिकृत निवेदनात असं म्हटलं आहे की, पोलीस आणि सुरक्षा दलांनी पुलवामामध्ये लष्कर-ए-तैयबाच्या दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे. हे दहशतवादी हल्ला करण्याच्या प्लानमध्ये होते.

हेही वाचा-  100 कोटी वसुली प्रकरणाला नवे वळण CBI विरोधात राज्य सरकाराची हायकोर्टात धाव!

 अशा परिस्थितीत सुरक्षा दलानं त्यांना अटक केल्यानं मोठा धोका टळला आहे. अमीर बशीर आणि मुख्तार भट अशी अटक करण्यात आलेल्या दोन्ही दहशतवाद्यांची नावे आहेत. चौकात तपासणी दरम्यान त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून IED जप्त करण्यात आले आहेत. सध्या दोघांची चौकशी सुरू आहे.

हेही वाचा-  TMC Recruitment: टाटा मेमोरियल सेंटर मुंबई इथे 1,10,000 रुपये पगाराची नोकरी; 170 जागांसाठी भरती

एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, दक्षिण काश्मीरच्या कुलगाममधील पोम्बे भागात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी परिसराला घेराव घालून सर्च ऑपरेशन सुरु केलं. त्यानंतर ते म्हणाले की, दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या पथकावर गोळीबार केल्यानंतर सर्च ऑपरेशनचं रुपांतर चकमकीत झालं. अधिकाऱ्याने सांगितलं की गोळीबार सुरू आहे आणि अपडेटच्या प्रतीक्षेत आहोत.

First published:

Tags: Jammu and kashmir, Terrorist attack