World Cup 2019 : चोकर्सचा ठप्पा मिटवण्यासाठी साऊथ आफ्रिकेनं निवडला ‘हा’ संघ

World Cup 2019 : चोकर्सचा ठप्पा मिटवण्यासाठी साऊथ आफ्रिकेनं निवडला ‘हा’ संघ

1992, 1999, 2007 आणि 2015मध्ये साऊथ आफ्रिका उपांत्य फेरी पर्यंत पोहचली पण त्यांना चॅम्पियन हा टॅग कधीच मिळाला नाही.

  • Share this:

केपटाऊन, 18 एप्रिल : विश्वचषकात कायम कागदावर बलाढ्य दिसणार कोणत्या देशाचा संघ असेल तर, तो देश आहे साऊथ आफ्रिका. गेली कित्येक वर्षे जगातील सर्वोत्तम गोलंदाज आणि फलंदाज यांच्यासह विश्वचषक खेळण्यासाठी साऊथ आफ्रिकेचा संघ मैदानात उतरतो. मात्र आजवर एकदाही चॅम्पियन बनण्याचा मान त्यांना मिळाला नाही. म्हणूनच त्यांना चोकर्स असं संबोधलं जात.

दरम्यान, यंदा इंग्लंडमध्ये होऊ घातलेल्या विश्वचषकासाठी जवळजवळ सर्व संघानी आपल्या 15 शिलेदारांची नावं घोषित केली आहेत. त्यामुळं सर्वांचं लक्ष लागलं होतं ते साऊथ आफ्रिकेच्या संघाकडं. आज साऊथ आफ्रिकेनं फाफ डुप्लेसीसच्या नेतृत्वाखाली 15 सदस्यांच्या संघाची घोषणा केली. यंदाही हा संघ कागदावर बलाढ्य दिसत आहे. कारण इमरान ताहीर सारखा फिरकी गोलंदाज, डेल स्टेन सारखा जलद गोलंदाज तर हाशिम आमला सारखा अनुभवी फलंदाज त्यांच्याकडे आहे.

या 15 जणांच्या संघात साऊथ आफ्रिकेनं कसोटी स्पेशालिस्ट समजल्या जाणाऱ्या एडेन मार्करमलाही स्थान दिलं आहे. मात्र, तरी चाहत्यांमध्ये एकच चर्चा साऊथ आफ्रिका यंदा तरी चोकर्सचा टॅग पुसणार का?

पहिल्याच वर्ल्ड कप सामन्यात पावसानं केला घात

1992 साली पहिल्यांदा साऊथ आफ्रिकेचा संघ विश्वचषक स्पर्धेत सहभागी झाला होता. आणि आपल्या पहिल्याच विश्वचषकात हा संघ सर्व संघांना भुल देऊन थेट उपांत्य फेरीत पोहचला. इंग्लंड विरुद्धच्या या सामन्यात 252 धावांचा पाठलाग करत असताना, 22 चेंडूत केवळ 13 धावांची गरज असताना, पंचांनी पावसामुळं सामना थांबवला. पावसानं त्यांचा घात केला आणि केवळ 1 चेंडूत 22 धावा करण्याची त्यांच्यावर वेळ आली, आणि अर्थात साऊथ आफ्रिकेनं हा सामना गमावला. क्रिकेटच्या इतिहासतला ही सर्वात गाजलेली किस्सा मानला जातो. त्यानंतर 1999, 2007 आणि 2015मध्ये साऊथ आफ्रिका उपांत्य फेरी पर्यंत पोहचली पण त्यांना चॅम्पियन हा टॅग कधीच मिळाला नाही.

साऊथ आफ्रिकेचा संघ : फाफ डुप्लेसीस, क्विंटन डी कॉक, हाशिम आमला, एडेन मार्करम, रेसी वैन डर डुसां, डेव्हिड मिलर, जेपी ड्युमिनी, प्रिस्टोरियस, फेलुकवायो, डेल स्टेन, रबाडा, लुंगी एन्गिडी, एनरिज नॉर्तजे, इमरान ताहिर आणि तबरेज शम्सी.

VIDEO: कोणतही चिन्हं दाबलं तरी मत कमळालाच जातं: प्रकाश आंबेडकर

First published: April 18, 2019, 5:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading