VIDEO- या दाक्षिणात्य अभिनेत्याने निवडणूक प्रचारात कार्यकर्त्याला पाठलाग करत मारलं

VIDEO- या दाक्षिणात्य अभिनेत्याने निवडणूक प्रचारात कार्यकर्त्याला पाठलाग करत मारलं

याआधी निवडणूक प्रचारादरम्यान, एका पत्रकाराच्या कानशिलात लगावली होती. तसेच पत्रकाराला जीवे मारण्याची धमकीही दिली होती.

  • Share this:

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अभिनेते आणि नेते नंदमुरी बाळाकृष्ण पुन्हा एकदा वादात अडकले आहेत. गेल्या काही दिवसांपासून निवडणूक प्रचारादरम्यान, बाळाकृष्ण जनतेसोबतच्या व्यवहारामुळे चर्चेत राहत आहेत. सध्या तेलगुदेसम पक्षाच्या आमदाराचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे यात बाळाकृष्ण आपल्याच पक्षातील एका कार्यकर्त्याला मारताना दिसत आहेत.

नंदमुरी बाळाकृष्ण हे टीडीपीचे सर्वेसर्वा आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांच्या बहिणीचे पती आणि त्यांचा मुलगा नारा लोकेशचे सासरे आहेत. बाळाकृष्ण हे हिंदूपुर विधानसभा जागेवरून आमदार आहेत आणि तेलगुदेसम पक्षाच्या तिकीटावर यावेळीही विधानसभेच्या निवडणूका लढवत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार रोड शोवेळी बाळकृष्ण यांच्या रागाचा पारा चढला आणि त्यांनी आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्याला भर रस्त्यात मारहाण केली.

रिपोर्टनुसार. विजयनगरम जिल्ह्यात निवडणुकीच्या प्रचारात बाळाकृष्ण यांनी सहभाग घेतला होता. यावेळी तिथे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते गोळा झाले. यावेळी बाळाकृष्ण यांना कोणत्या तरी कारणामुळे प्रचंड राग आला आणि त्यांनी आपल्या कार्यकर्त्याला पळवून मारलं.

या ५० सेकंदांच्या या व्हिडीओला व्हायएसआर काँग्रेस पार्टीच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आले आहे. या व्हिडीओत बाळाकृष्ण स्पष्टपणे दिसत नसले तरी यावरून त्यांची मोठ्या प्रमाणात निंदा केली जात आहे. याआधी बाळाकृष्ण यांनी निवडणूक प्रचारादरम्यान, एका पत्रकाराच्या कानशिलात लगावली होती. त्यांनी फक्त पत्रकाराशीच गैरव्यवहार केला नाही तर त्याला शिवीगाळही केली. तसेच बाळाकृष्ण यांनी पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी दिली.

VIDEO: 'डे विथ लिडर' : असा सुरू होतो नवनीत राणां यांचा दिवस

First published: April 9, 2019, 10:38 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading