उणे २ अंश तापमानात हनिमून साजरं करतेय ही जोडी PHOTO VIRAL

लग्नानंतर नवदांम्पत्यांनी ग्रँड रिसेप्शनही ठेवलं. दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर कमालीचे व्हायरल झाले होते.

News18 Lokmat | Updated On: Feb 17, 2019 01:24 PM IST

उणे २ अंश तापमानात हनिमून साजरं करतेय ही जोडी PHOTO VIRAL

रजनीकांत यांची मुलगी सौंदर्याने ११ फेब्रुवारीला अभिनेता आणि व्यावसायिक विशगन वंगामुडीशी लग्न केलं. लग्नानंतर नवदांम्पत्यांनी ग्रँड रिसेप्शनही ठेवलं. दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर कमालीचे व्हायरल झाले होते. सध्या दोघं आयलँडमध्ये हनीमूनसाठी गेले आहेत.

सौंदर्याने आपल्या हनीमूनचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. फोटोंना कॅप्शन देताना तिने लिहिले की, #Iceland #Honeymoon #Freezing #LovingIt #LivingLife #GodsAreWithUs #MissingVed.

विशगन आणि सौंदर्या दोघं एकत्र फार आनंदी दिसत आहेत. फोटोत सौंदर्याने ब्लॅक लूकला प्राधान्य दिलं आहे तर विशगन जांभळ्या रंगाचे स्वेटशर्ट घातले आहे. दोघांनी चैन्नईतील हॉटेल लीला पॅलेसमध्ये लग्न केले. लग्नानंतर दोघांनी ग्रँड रिसेप्शनचं आयोजन केलं होतं. सौंदर्या आणि विशगनच्या लग्नाला सिनेसृष्टीसह राजकीय आणि व्यावसायिक क्षेत्रातील अनेक मात्तबर मंडळी आली होती. अंबानी कुटुंबीयही नवदाम्पत्यांना आशीर्वाद द्यायला चेन्नईत गेले होते.Loading...

तमिळनाडूचे मुख्यमंत्री पलानिस्वामी यांनीही लग्नाला आवर्जुन हजेरी लावली होती. सौंदर्याचं हे दुसरं लग्न आहे. २०१० मध्ये सौंदर्याने व्यावसायिक अश्वनी राजकुमारशी विवाह केला होता. लग्नाच्या आठ वर्षांनंतर दोघांनी घटस्फोट घेतला. तिला एक चार वर्षांचा वेदकृष्ण हा मुलगा आहे. सौंदर्याचा नवरा विशगन हा दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील एक अभिनेता आहे. नोव्हेंबरमध्ये एका खासगी समारंभात दोघांनी साखरपुडा केला होता. सौंदर्याप्रमाणेच विशगन याचंही हे दुसरं लग्न आहे. त्याचं पहिलं लग्न मासिकाची संपादिका कनिखा कुमारनशी झालं होतं.

'मेरे घर मे हैं मेरी बुढी माँ', शहीद नितीन राठोड यांच्या नावाने भावुक VIDEO व्हायरल


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 17, 2019 01:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...