गणित शिकवताना शिक्षक करायचा बॅड टच, विद्यार्थिनींनी सांगितला नकोसा वाटणारा प्रसंग

गणित शिकवताना शिक्षक करायचा बॅड टच, विद्यार्थिनींनी सांगितला नकोसा वाटणारा प्रसंग

गणिताचे शिक्षक आम्हाला मारतात, छेड काढतात, गैरव्यवहार करत आम्हाला वाईट पद्धतीने स्पर्श करतात अशी तक्रार मुलींकडून करण्यात आली आहे.

  • Share this:

हरियाणा, 04 मे : गणिताचे शिक्षक खुप वाईट पद्धतीने स्पर्श करत असल्याची तक्रार दहवीच्या विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे. हा धक्कादायक प्रकार हरियाणातील गोहानाच्या जोली गावात सरकारी शाळेत घडला आहे. या संपूर्ण प्रकारामुळे पालकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.

या सरकारी शाळेमध्ये 10वीच्या 6 विद्यार्थ्यांनी यासंबंधी तक्रार दाखल केली आहे. गणिताचे शिक्षक आम्हाला मारतात, छेड काढतात, गैरव्यवहार करत आम्हाला वाईट पद्धतीने स्पर्श करतात अशी तक्रार मुलींकडून करण्यात आली आहे. शिक्षक वर्गात आमच्याशी अश्लील बोलतात अशीही तक्रार विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे.

हेही वाचा : नवसाला पावणाऱ्या रेणुका देवीच्या दानपेटीवर डल्ला..भाजप नेताच निघाला चोरटा?

सुशील असं शाळेतील गणित विषय शिकवणाऱ्या शिक्षकाचं नाव आहे. जेव्हा शुक्रवारी विद्यार्थिनी शाळेत गेल्या तेव्हा कारण नसतानाही शिक्षकाने त्यांना कठोर शिक्षा दिली. तक्रार देताना विद्यार्थि रडत असल्याची माहितीही देण्यात आली आहे.

आम्हाला शाळेत सर मारायचे ते ठीक होतं, पण सरांनी पहिल्यांदा नाही तर शुक्रवारीदेखील गुप्तांगाला हात लावत छेड काढण्याचा प्रयत्न केला असं विद्यार्थिनींकडून सांगण्यात आलं आहे.

सर जीवे मारण्याची धमकी द्यायचे...

शाळा सुटल्यानंतर सर आम्हाला शाळेतून बाहेर काढायचे आणि हा प्रकार कोणाला सांगितला तर जीवे मारेन अशी धमकी द्यायचे. पण धाडस करत विद्यार्थिनी हा प्रकार कुटुंबीयांना सांगितला. त्यांनतर यासंदर्भात आता तक्रार करण्यात आली असून शिक्षकावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

कुटुंबीयांसोबत विद्यार्थ्यांनी केली तक्रार

गोहाना खंडाच्या बीईओ सुभाष भारद्वाज यांच्याकडे तक्रार करण्यासाठी विद्यार्थि गेल्या असता, त्याचं ऑफिस बंद होतं. त्यामुळे या प्रकरणी राजकीय कन्या वरिष्ठ माध्यमिक विद्यालयाच्या प्राध्यापकांना याबद्दल सांगण्यात आलं आहे. या सगळ्यावर शिक्षकावर कारवाई करण्याचे मागणी सर्वस्तरातून होत आहे. तर सगळ्यात धक्कादायक म्हणजे आता आम्हाला आता शाळेत शिकायचं नसल्याचं विद्यार्थिनींचं म्हणणं आहे.

VIDEO: रोड शोमध्ये तरुणाने अरविंद केजरीवालांच्या श्रीमुखात लगावली

First published: May 4, 2019, 7:17 PM IST

ताज्या बातम्या