राहुल गांधी लवकरच काँग्रेसचे अध्यक्ष बनतील- सोनिया गांधी

राहुल गांधी लवकरच काँग्रेसचे अध्यक्ष बनतील- सोनिया गांधी

राहुल गांधी लवकरच अध्यक्ष होणार असल्याचं दस्तुरखुद्द सोनिया गांधींनीच स्पष्ट केलंय. त्याबाबत नवी दिल्लीत त्यांनी काल एक सूचक वक्तव्य केलं. तुम्ही इतकी वर्षं विचारत होतात ना कधी होणार म्हणून, ते आता होतंय असं त्या म्हणाल्या.

  • Share this:

नवी दिल्ली, 14 ऑक्टोबर : राहुल गांधी लवकरच अध्यक्ष होणार असल्याचं दस्तुरखुद्द सोनिया गांधींनीच स्पष्ट केलंय. त्याबाबत नवी दिल्लीत त्यांनी काल एक सूचक वक्तव्य केलं. तुम्ही इतकी वर्षं विचारत होतात ना कधी होणार म्हणून, ते आता होतंय असं त्या म्हणाल्या. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह ६ राज्यांमधल्या प्रदेश काँग्रेस समित्यांनी तसे ठरावही मंजूर केलेत. दिवाळीनंतर याबाबत अधिकृत घोषणा होईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय.

२०१९च्या पार्श्वभूमीवर हा निर्णय झाल्याचं कळतंय. कारण पक्षासंबंधीचे निर्णय असतील, रणनीती किंवा कुठल्या नियुक्त्या मार्गी लावण्यासाठी पक्षाची धुरा ही एका व्यक्तीच्या हाती असलेली कधीही चांगली असते. पण काँग्रेसमध्ये अनेक निर्णय हे सोनिया आणि राहुल गांधींमध्ये अडकून पडायचे, अशा तक्रारी गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेस नेत्यांकडून होतायत.

तसंच अलिकडच्या काळात सोनिया गांधीची ही प्रकृतीही फारशी ठिक नसते, या पार्श्वभूमीवरच अखेर सोनिया गांधींनी पक्षाध्यक्षपद राहुल गांधींकडे सुपूर्त करण्याचं निश्चित केलंय. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या आत्मचरित्रपर पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात सोनिया गांधींनी यासंबंधीचे स्पष्ट संकेत दिलेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 14, 2017 03:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading