काँग्रेस अध्यक्ष निवडीचा सस्पेन्स अखेर संपला, सोनिया गांधींकडे पुन्हा पक्षाची धुरा

काँग्रेस अध्यक्ष निवडीचा सस्पेन्स अखेर संपला, सोनिया गांधींकडे पुन्हा पक्षाची धुरा

काँग्रेसचा अध्यक्ष कोण होणार? या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. सोनिया गांधी यांनी पुन्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा आपल्याकडे सांभाळली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 10 ऑगस्ट : काँग्रेसचा अध्यक्ष कोण होणार? या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. सोनिया गांधी यांनी पुन्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा आपल्याकडे सांभाळली आहे. काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. सोनिया यांची निवड झाल्यामुळे राहुल गांधी यांचा राजीनामा स्विकारण्यात आला आहे.

लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यामुळे राहुल गांधी यांनी नैतिक जबाबदारी स्विकारत अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. राहुल गांधी यांची मनधरणीही करण्यात आली परंतु, ते आपल्या निर्णयावर ठाम होते. राहुल यांच्यानंतर पक्षाचा अध्यक्ष कोण असणार यावरून बरीच चर्चा रंगली होती.महाराष्ट्र काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये मुकुल वासनिक यांचं नाव घेतलं जातं होतं. परंतु, आज काँग्रेसच्या बैठकीत पुन्हा एकदा सोनिया गांधी यांची निवड करण्यात आली आहे. सोनिया यांनी 1998 पासून ते 2017 पर्यंत अध्यक्षपद भूषवले होते.

असा आहे काँग्रेसच्या अध्यक्षांचा इतिहास

भारतातील सर्वात जुन्या काँग्रेस पक्षात आतापर्यंत प्रत्येक अध्यक्षांनी इतिहासाच्या पानात आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. तब्बल 19 वर्षांनंतर बदल करत राहुल गांधींची अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती.

1985 मध्ये काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. भारताला स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत काँग्रेस पक्षात 15 नेत्यांनी नेतृत्वाची धुरा सांभाळली. यापैकी 4 जण हे नेहरू-गांधी घराण्याशी संबंधीत आहे. राहुल गांधी हे गांधी घराण्यातील पाचवे व्यक्ती आहे जे अध्यक्ष झाले आहे.

1927 पासून ते भारताला स्वांतत्र्य मिळेपर्यंत 38 वर्ष नेहरू-गांधी घराण्याचं नेतृत्व राहिलं आहे. जवाहरलाल नेहरू यांनी 3 वर्षं, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी प्रत्येकी 8-8 वर्ष अध्यक्ष राहिले आहे. तर सोनिया गांधींनी सर्वाधिक 19 वर्ष काँग्रेसचे अध्यक्षपद भुषवले आहे.

स्वातंत्र्यापूर्वी राहुल गांधींचे खापरपंजोबा मोतीलाल नेहरू पक्षाचे अध्यक्ष राहिले होते. मोतीलाल नेहरू हे काँग्रेस अध्यक्ष म्हणून या घराण्यातून पहिले व्यक्ती होते.

महात्मा गांधी, सरदार वल्लभाई पटेल, सुभाषचंद्र बोस, अबुल कलाम आजाद आणि सरोजिनी नायडू या दिग्गजांनी काँग्रेस पक्षाचे नेतृत्व केले होते.

डिसेंबर 1885 मध्ये काँग्रेसमध्ये काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात पत्रकार आणि बॅरिस्टर वोमेश चंद्र बोनर्जी यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली होती. तर दादा भाई नौरोजी हे काँग्रेसचे अध्यक्ष होणारे दुसरे व्यक्ती ठरले होते.

सोनिया गांधी परदेशातील असल्यामुळे अनेकांनी सवाल उपस्थितीत केले होते पण त्यांच्या आधी 5 अशा व्यक्ती होत्या जा काँग्रेसच्या अध्यक्षापदाची धुरा सांभाळली होती आणि त्यांचा जन्म भारताबाहेर झाला होता. आता पुन्हा एकदा पक्षाला उभारी देण्यासासाठी सोनिया गांधी यांनी पक्षाची कमान हाती सांभाळली आहे.

====================================================================

VIDEO : दीपाली सय्यदचं उपोषण सुरूच, मानसीला अश्रू अनावर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 10, 2019 11:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading