राम गणेश गडकरींऐवजी वासुदेव बेंद्रेंचा पुतळा बसवा,सदानंद मोरेंचा सल्ला

राम गणेश गडकरींऐवजी वासुदेव बेंद्रेंचा पुतळा बसवा,सदानंद मोरेंचा सल्ला

वासुदेव बेंद्रे यांनी संभाजी महाराजांचं खरं चरित्र लिहिलं समोर आणलं. गडकरी यांनी उपलब्ध साधनसामुग्रीनुसार संभाजी महाराज रंगवले.

  • Share this:

05 जून : पुण्यातल्या संभाजी उद्यानात राम गणेश गडकरी यांच्याऐवजी संभाजी महाराज यांचे चरित्रकार वासुदेव सीताराम बेंद्रे यांचा पुतळा बसवावा, असा सल्ला सदानंद मोरे यांनी दिलाय.

वासुदेव बेंद्रे यांनी संभाजी महाराजांचं खरं चरित्र लिहिलं समोर आणलं. गडकरी यांनी उपलब्ध साधनसामुग्रीनुसार संभाजी महाराज रंगवले. पण बेंद्रे यांनी खरे संभाजी महाराज पुढं आणले असं मोरे यांनी म्हटलंय. बेंद्रे यांनी मालोजीराजे, शहाजीराजे ,संभाजीराजे यांचं चारित्रलेखन केलेलं आहे. वा. सी. बेंद्रे हेदेखील गडकरी यांच्याप्रमाणे सीकेपी होते. यामुळे मराठा-सीकेपी वाद निरर्थक आहे, असं सदानंद मोरे यांनी म्हटलंय.

कोण होते वासुदेव बेंद्रे?

- इतिहासाचे भीष्माचार्य असा त्यांचा उल्लेख केला जातो

- 40 वर्ष संशोधन करून त्यांनी संभाजी महाराजांचं चरित्र नव्यानं लिहिलं

- या चरित्रामुळेच संभाजी महाराज पराक्रमी, मुत्सद्दी, धोरणी होते हे पुढे आलं

- 1918 मध्ये त्यांनी संभाजी राजांवर संशोधनाला सुरुवात केली

- 1958 मध्ये छत्रपती संभाजी महाराज हे चरित्र लिहून तयार झालं

- वढू बुद्रुक इथली संभाजी महाराजांची समाधी त्यांनी शोधून काढली

- 1933 मध्ये शिवाजी महाराजांचं डच चित्रकारानं रेखाटलेलं चित्र बेंद्रे यांनीच पुढे आणलं

- शिवाजी महाराजांचं हेच चित्र आज अधिकृत मानलं जातं

- 70 वर्षांच्या संशोधन काळात त्यांनी 60 पेक्षा जास्त पुस्तकं लिहिली

- वयाच्या 80 व्या वर्षी राजाराम महाराजांचं चरित्र त्यांनी प्रकाशित केलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 5, 2017 08:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading