'या' सिनेमांना बसणार भारत- पाकिस्तानच्या तणावाचा फटका

'या' सिनेमांना बसणार भारत- पाकिस्तानच्या तणावाचा फटका

मात्र सध्या देशात जे तणावाचं वातावरण आहे त्याचा फटका या दोन्ही सिनेमांना बसू शकतो.

  • Share this:

मुंबई, २८ फेब्रुवारी २०१९- यावेळी महिन्याच्या पहिल्या तारखेला शुक्रवार आहे. १ मार्चला दोन बिग बजेट सिनेमे प्रदर्शित होत आहेत. सोनचिरैया आणि लुका छुपी हे दोन सिनेमे उद्या प्रदर्शित होत आहेत. लुका छुपी एक विनोदीपट आहे. या सिनेमात लग्नाची एक वेगळी संकल्पना मांडण्यात आली आहे. तर सोनचिरैया सिनेमाची कथा चंबलच्या खोऱ्यातील गुंडाभोवती फिरते. १९७० च्या पार्श्वभूमीवर हा सिनेमा आधारीत आहे.

सिनेमांतील मुख्य कलाकारांबद्दल बोलायचे झाले तर, लुका छुपी सिनेमात कार्तिक आर्यन आणि क्रिती सेनन यांच्या मुख्य भूमिका आहेत. तर सोनचिरैया सिनेमात सुशांत सिंग राजपूत आणि भूमी पेडणेकर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. दोन्ही सिनेमाची स्टारकास्ट एवढी तगडी आहे की प्रेक्षक आपसूक चित्रपटगृहाकडे ओढले जातील. मात्र सध्या देशात जे तणावाचं वातावरण आहे त्याचा फटका या दोन्ही सिनेमांना बसू शकतो.

सिनेतज्ज्ञांकडून असं म्हटलं जात आहे की, ज्यांनी उरी सिनेमा अजूनपर्यंत पाहिला नाही ते या आठवड्यात तोच सिनेमा पाहण्याची शक्यता जास्त आहे. अशावेळी लुका छुपी आणि सोनचिरैया या दोन्ही सिनेमांची संथ सुरूवात होऊ शकते. कारण पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर आणि भारतीय वायुसेनेने पाकिस्तानातील बालाकोट येथे केलेल्या एअर स्ट्राइकनंतर इंटरनेटवर उरी सिनेमाच्या सर्चमध्ये वाढ झाली आहे. याचा फटका १ मार्चला प्रदर्शित होणाऱ्या दोन्ही सिनेमांवर होणार यात काही शंका नाही.

दरम्यान, भारतीय हवाई दलाचे वैमानिक अभिनंदन वर्तमान हे भारतात परतण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. 'भारतीय वैमानिकाची सुटका करण्याबाबत भारतासोबत खुल्या दिलानं तडजोड करायला तयार आहे,' असं वक्तव्य पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी केलं आहे. याबाबत पाकिस्तानी माध्यमांनी वृत्त दिलं आहे.

'भारतीय वैमानिक आमच्याकडे सुरक्षित आहे. पाकिस्तानी लष्कर एक जबाबदार लष्कर असून आम्ही लष्करी संकेतांचा आदर करतो,' असं शाह मेहमूद यांनी भारतीय माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

परिस्थितीतून तोडगा निघावा अशी आमची इच्छा आहे. वातावरण निवळलं की आम्ही ताब्यात घेतलेल्या भारतीय वैमानिकाला सोडण्याचा विचार करू,' असं विधान पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी याआधी केलं होतं. पाकिस्तानने अभिनंदन वर्तमान या वैमानिकाला बुधवारी ताब्यात घेतलं आहे.

SPECIAL REPORT : लादेनसारखाच मसूदचा पण होईल का खात्मा?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 28, 2019 01:25 PM IST

ताज्या बातम्या