अॅण्टी- हिंदू पोस्ट शेअर केल्यामुळे सोनम कपूरला म्हटलं ‘देशद्रोही’

अॅण्टी- हिंदू पोस्ट शेअर केल्यामुळे सोनम कपूरला म्हटलं ‘देशद्रोही’

सोनम कपूरसोबत अभिनेता इम्रान खानची पत्नी अवंतिका मलिकालाही ट्रोल केले जात आहे. या दोघींनाही त्यांनी शेअर केलेल्या पोस्टसाठी ट्रोल केले जात आहे.

  • Share this:

मुंबई, २८ फेब्रुवारी २०१९- देशात सध्या एक वेगळंच वातावरण पाहायला मिळत आहे. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय फार रागात होते. यादरम्यान भारतीय वायुसेनेने एअर स्ट्राइक करून पाकिस्तानला जशास तसं उत्तर दिलं. पाकिस्तानच्या फायटर जेटचा पाठलाग करताना भारताचा विंग कमांडर अभिनंदन वर्तमान पाकव्याप्त काश्मिरात गेला. तेथे त्याला पाकिस्तानी लष्कराने पकडले. दोन दिवसांत भारतात एवढं काही होत असताना सोनम कपूरच्या एका वक्तव्यामुळे सोशल मीडियावर तिला चांगलेच ट्रोल केले जात आहे. तिला देशद्रोहीही म्हटले जात आहे.

सोनम कपूरसोबत अभिनेता इम्रान खानची पत्नी अवंतिका मलिकालाही ट्रोल केले जात आहे. या दोघींनाही त्यांनी शेअर केलेल्या पोस्टसाठी ट्रोल केले जात आहे. ह्युमनस ऑफ हिंदुत्व नावाच्या फेसबुक युझरचं आहे. सोनमला हिंदू आणि राष्ट्र विरोधी म्हटले जात आहे. सोशल मीडियावर या कंटेटला धार्मिक भावनांनी भरलेली पोस्ट असे म्हटले जात आहे. असंही म्हटलं जातं की, ही एक अण्टी- हिंदू प्रोपोगंडाने परिपूर्ण अशी पोस्ट आहे.

दरम्यान, भारत आणि आंतरराष्ट्रीय समुदायाकडून आलेल्या दबावानंतर पाकिस्तान अखेर विंग कमांडर अभिनंदन याची शुक्रवारी सुटका करणार आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी संसदेत त्यांनी ही घोषणा केली. अभिनंदनच्या सुटकेच्या बदल्यात भारतावर अटी घालण्याचा प्रयत्न पाकिस्तान करत होता. मात्र भारताने पाकिस्तानचे सर्व प्रयत्न धुडकावून लावले होते.

जिनिव्हा करारानुसार अभिनंदनला सोडणं पाकिस्तानला भाग होतं. तर पाकिस्तानचा दबावाचा प्रयत्न होता. भारताने आक्रमक भूमिका घेतल्याने पाकिस्तानला आणखी हल्ल्याची भीती वाटत होती. पाकिस्तानचा हा डाव भारताला माहित होता. त्यामुळे अशी कुठलीही अट भारताने मान्य केली नाही आणि अखेर पाकिस्तानला भारताच्या दबावापुढे झुकावं लागलं. कंदहार विमान अपहरणाच्या वेळी जसा भारतावर दबाव होता तसा पाकिस्तानचा प्रयत्न आहे. मात्र भारताने पाकिस्तानचा डाव उलटविला.

SPECIAL REPORT : लादेनसारखाच मसूदचा पण होईल का खात्मा?

First published: February 28, 2019, 5:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading