मुंबई, 23 मार्च : अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेहमीच ट्विटरवर तिच्या आयुष्यातल्या घडामोडी ट्वीट करत असते. सगळीकडे वसंतऋतूचं आगमन झालंय. आजूबाजूला पाहिलं तर अनेकविध रंगांची फुलं दिसतायत. अशात सोनालीनं आपल्या घरच्या बागेचा फोटो ट्वीट केलाय.
या फोटोत सोनालीची लेक कावेरी चक्क बागकाम करतेय. बागकाम करत असताना ती चांगलीच रमलीय. सोनालीनं लिहिलंय, वसंत ऋतू आलाय आणि माझी लेक बागेत काम करतेय.मी कधीच चिखलांचे पडलेले डाग आणि सांडलेलं पाणी याची तक्रार करत नाही.
सोनाली सिनेमा आणि सामाजिक कामं याला जितका वेळ देते, त्याहून ती तिच्या कुटुंबाला देते. एकदा बोलताना ती म्हणाली होती, मी फिटनेसची रोजच काळजी घेते. पण कुटुंबाला दिला जाणाऱ्या वेळेत तडजोड करून नाही. म्हणूनच कावेरी शाळेत गेली की मगच ती पुढचे तास फिटनेसला देते.
My spring and her colours I never want to complain about mud marks and spilt water happy garden - happy family..! #secretgarden #SpringTime pic.twitter.com/DYKJqDlf9e
— sonalikulkarni (@sonalikulkarni) March 19, 2019
होळीच्याच वेळी वसंत ऋतूचं आगमन होतं. त्याही वेळी सोनालीनं बा. सी. मर्ढेकरांची सुंदर आणि अर्थपूर्ण कविता ट्विट केलीय. तिनं म्हटलंय, मनातलं सगळं कुरूप जळून जाऊ दे.
आज होळी आहे..
— sonalikulkarni (@sonalikulkarni) March 20, 2019
बा. सी. मर्ढेकराची कविता..
माझी प्रार्थना..
मनातलं कुरूप सगळं जळून जाऊ दे
भंगू दे काठीण्य माझे
आम्ल जाऊ दे मनिचे..
येवु दे वाणीत माझ्या
सूर तुझ्या आवडीचे..||
धैर्य दे अन् नम्रता दे
पाहण्या जे जे पहाणे..
वाकू दे बुध्दीस माझ्या
तप्त पोलादाप्रमाणे..||#HappyHoli
सोनाली कुलकर्णी स्वत: संवेदनशील कलाकार आहे. अनेक भूमिकांमधल्या वैविध्यतेनं तिनं आपला ठसा उमटवलाय.
VIDEO: लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघाला किल्ले शिवनेरी
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sonali kulkarni, Tweet