Home /News /news /

Sonali Khare: मनापासून foodie असणाऱ्या सोनाली खरेच्या फिटनेसच रहस्य नेमकं काय?

Sonali Khare: मनापासून foodie असणाऱ्या सोनाली खरेच्या फिटनेसच रहस्य नेमकं काय?

फिटनेसच्या बाबतीत कायमच खरे आणि चांगले बोल ऐकवणारी अभिनेत्री (Sonali Khare) सोनाली खरे ही न्यूज 18 लोकमतशी बोलताना काय म्हणाली?

    मुंबई 21 जून: मराठीतील एक फिट अँड फाईन अभिनेत्री म्हणून सोनाली खरे (Sonali Khare) हिच्याकडे पाहिलं जातं. सोनाली फिटनेसबद्दल (Sonali Khare Fitness) बरीच जागरूक असते किंबहुना सध्या ती तिच्या खास शो मधून सुद्धा याबद्दल बरीच जागरूकता आणताना दिसते. आज आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने सोनाली न्यूज 18 लोकमतशी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जोडली गेली होती. तिकडे तिने फिटनेसचं रहस्य सांगितलं आहे. सोनाली ‘खरे बोल’ (Khare Bol) या कार्यक्रमाच्या निमीत्ताने सध्या ओळखली जाते. मराठीतील अनेक नामवंत कलाकारांसोबत सोनाली व्यायाम करताना दिसते. त्यांच्याशी फिटनेसच्या गप्पा, त्यांच्या फिटनेस रुटीनबद्दल जाणून घेताना ती दिसते. सोनाली स्वतःसुद्धा खूप फिटनेसकडे लक्ष देणारी आहे. याचा अर्थ ती फक्त डाएट करते आणि सतत व्यायाम करते असं नाही. तिने आहार कसा असावा, व्यायाम कसा करावा, योगाचे फायदे याबद्दल योग्य मार्गदर्शन केलं. तिला फिटनेसकडे लक्ष देताना कोणत्या गोष्टीवर कंट्रोल करावं लागलं याबद्दल सुद्धा ती बोलताना दिसली. “आहे ती बॉडी मेंटेन करायला खूप मेहनत घ्यायला लागते. मी खूप खवय्यी आहे. विशेतः गोड हा माझा weak point आहे. पण मी आता कटाक्षाने गोड पदार्थ कमी करायचा प्रयत्न केला आहे. पूर्ण बंद केलं नाहीये आणि करू सुद्धा नये असं मला वाटत. आपल्या मराठी संस्कृतीमध्ये एवढे उत्कृष्ट चवीचे पदार्थ आहेत ते न खाता राहूच नये पण ते किती खावे? प्रमाण काय असावं? कधी खावे? याकडे मात्र बारकाईने लक्ष द्यायला हवं. माझं वजन पटकन वाढत अशी माझी प्रकृती आहे. जर एखाद्या कार्यक्रमाच्या, सणाच्या निमित्ताने मी दणकून खाल्लं असेन तर पुढचे दोन दिवस मी कमी प्रमाणात जेवते. भूक कधीच मारू नये पण समतोल राखून खावं आणि व्यायाम करावा.” तिला अनेकांनी अशी कॉम्प्लिमेंट दिली की ते तिला अनेकवर्ष पाहत आहेत आणि तरी ती खूप मेंटेन आहे, एकदम फिट आहे. हे ही वाचा- Jitendra Joshi: जितेंद्र जोशीनं घेतलं तुकोबांच्या पालखीचं घेतलं दर्शन अन् आली आजीची आठवण, म्हणाला... सोनालीने योगासनांबद्दल बऱ्याच प्रमाणात मार्गदर्शन केलं. तुमच्या रोजच्या आयुष्यात व्यायामाला किती महत्त्वाचं स्थान आहे हे तिने सांगितलं तसंच फिटनेस, योगा, डाएटबद्दल असणाऱ्या अनेक शंकाकुशंकांच निवारण सुद्धा केलं.
    Published by:Rasika Nanal
    First published:

    Tags: Fitness, Marathi actress, Marathi entertainment, Yoga day

    पुढील बातम्या