हे 'राम' कदमांनी सोनाली बेंद्रेला केलं मृत घोषित

News18 Lokmat | Updated On: Sep 7, 2018 03:02 PM IST

हे 'राम' कदमांनी सोनाली बेंद्रेला केलं मृत घोषित

निलीमा कुलकर्णी, 07 सप्टेंबर : मुलीला पळवून नेण्यास मदत करण्याच्या वक्तव्यामुळे भाजपचे आमदार राम कदम अडचणीत सापडले होते नुकताच त्यांनी माफीनामा सादरही केला. पण आता तर खुद्द राम कदम यांनी आणखी एक वाद ओढावून घेतलाय. अभिनेत्री सोनाली बेंद्रेचं निधन झालं असं राम कदमांनी जाहीरच करून टाकलंय.

राम कदम यांनी आज दुपारी 1.50 च्या सुमारास एक टि्वट केलंय. या टि्वटमध्ये राम कदमांनी सोनाली बेंद्रे यांचं निधन झाल्याचं जाहीर केलं.

राम कदम टि्वटमध्ये, "हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीमधली अभिनेत्री आणि एकेकाळी सर्व प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी आणि आपल्या अभिनयाने सर्वांचे डोळ्याचे पारणे फेडणारी अभिनेत्री सोनाली बेंद्रे पडद्याआड...यांचं अमेरिकेत निधन झालं आहे. भावपूर्ण श्रद्धांजली..." असं लिहिलंय.

आपल्याकडून चुकून टि्वट झालंय हे लक्ष्यात आल्यावर अर्ध्यातासानंतर त्यांनी ते टि्वट डिलिट केलंय. आणि "सोनाली बेंद्रे यांच्या निधनाबद्दल अफवा पसरवल्या जात आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होवो अशी मी प्रार्थना करतो' अशी सारवासारव करत नवीन टि्वट केलं.

बरं राम कदमांकडून असं वागणे हे काही पहिल्यांदाच घडत नाही. याच आठवड्यात सोमवारी झालेल्या दहीहंडी उत्सवातही राम कदमांची जीभ घसरली होती. राम कदम म्हणाले की, तुम्ही कोणतही काम मला सांगा मी ते काम करणार असं सांगत त्यांनी त्यांचा फोन नंबर जाहीर केला. त्यावेळी त्यांनी जे उदाहरण दिलं ते त्यामुळं वाद निर्माण झाला. तुम्ही समजा एखाद्या मुलीला प्रमोज केलं आणि ती नाही म्हणाली तर मला सांगा. मी तेही काम करेल. त्यासाठी तुम्ही तुमच्या आईवडिलांना घेऊन या. त्यांनी हो म्हटलं तर मी तिला पळवून आणून तुम्हाला देईन, असं राम कदम यांनी म्हटलं आणि त्यांच्यावर टीकेची झोड उठली.

त्यानंतर राज्यभरात राम कदम यांच्या विरोधात सर्वपक्षीय नेत्यांनी ठिकठिकाणी निदर्शनं केली. ठिकठिकाणी राम कदम यांच्या पुतळ्याला जोडे मारून आंदोलनं करण्यात आलीय.

दरम्यान, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राम कदम यांच्या वक्तव्यावर भाष्य केलं. राम कदम यांनी माफी मागितली आहे. कदम यांचा मागची कारकिर्द मोठी आहे. त्यांनी अनेक महिलांना मदत केलीये. त्यांच्या मतदारसंघात हजारो महिला राखी बांधत असतात. त्यामुळे एखाद्या वाक्यामुळे इतका गदारोळ मांडायची आवश्यक्ता नाहीये. आता त्यांनी माफी मागितली विषय संपवला पाहिजे असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी राम कदम यांना पाठीशी घातलं. तसंच राम कदम प्रवक्तेपदावर कारवाई ही प्रदेश अध्यक्ष दानवे निर्णय घेतील असंही त्यांनी सांगितलं.

VIDEO : फक्त हात लावूनच दाखवा, पुण्याच्या तरूणीचं राम कदम यांना खुलं आव्हान

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 7, 2018 02:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close