मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

Web Showमध्ये सोनाक्षीनं गलावली कॉमेडियनच्या कानशिलात; VIDEO व्हायरल

Web Showमध्ये सोनाक्षीनं गलावली कॉमेडियनच्या कानशिलात; VIDEO व्हायरल

सोनाक्षी सिन्हा

सोनाक्षी सिन्हा

'डबल एक्सएल' या सिनेमात अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सिनेमाच्या प्रमोशन दरम्यानचा तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Minal Gurav

मुंबई,  28 सप्टेंबर : बॉलिवूड अभिनेत्री सौनाक्षी सिन्हा गेले अनेक दिवस सिनेक्षेत्रापासून लांब होती. मोठ्या ब्रेकनंतर सोनाक्षी आता 'डबल एक्सएल' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दरम्यान सोनाक्षी सिनेमाचं दणकून प्रमोशन करताना दिसत आहे. प्रमोशन करतानाचा सोनाक्षीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात सोनाक्षी एका प्रसिद्ध कॉमेडियनच्या खानकन कानाखाली वाजवताना दिसत आहे. नुकतीच सोनाक्षी रितेश देशमुखच्या 'केस तो बनता है' या कार्यक्रमात गेली होती. तिथे चालू कार्यक्रमात सोनाक्षीनं कॉमेडियनच्या कानाखाली गलावली आहे.

अभिनेता रितेश देशमुखचा 'केस तो बनता हैं' या वेब शोचा टीझर समोर आला आहे. टीझरमध्ये सोनाक्षी सिन्हा, अभिनेता रितेशच्या देशमुख आणि वरुण शर्माच्या कोर्टरूम ड्रामा शोमध्ये आली आहे. शोमध्ये कॉमेडियन पारीतोश त्रिपाठी सोनाक्षीच्या दबंग सिनेमातील डायलॉग तिला बोलून दाखवतो.  पारितोष सोनाक्षीला म्हणतो 'आज मी इथे तुझ्यावर अनेक आरोप करायला आलो आहे'. सोनाक्षी देखील त्याचे आरोप ऐकून घेते.

हेही वाचा - Drishyam 2 : 2 ऑक्टोबरला काय घडलं? उघडणार मोठं गुपित; 'दृश्यम 2' या दिवशी होणार रिलीज

त्यानंतर पुढच्या सेशनमध्ये सोनाक्षी चांगलीच भडकल्याचं दिसत आहे.  रागात ती त्याला 'बोल माझ्या सिनेमातील डायलॉग बोल'. तो म्हणतो 'थप्पड से डर नही लगता हैं प्यार से लगता हैं'. त्यावर सोनाक्षी त्याला 'थप्पड से डर नही लगना हैं तो ये ले'. असं म्हणत खानकन कानाखाली लगावते. सोनाक्षीचा हा अवतार रितेश देखील पाहत बसतो.

शोमध्ये सोनाक्षी कॉमेडियनच्या लगावलेली कानाखाली ही शोचा एक भाग होती. पण सोनाक्षीचा रुद्र अवतार पाहून सगळ्यांचीच झोप उडाली.  केस तो बनता हैं या शोमध्ये सोनाक्षीचा ग्लॅमरस लुक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.  30 सप्टेंबरला हा शो Amazon Mini Tv वर रिलीज होणार आहे.

First published:

Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood actress, Bollywood News