सोनई हत्याकांडातील 6 दोषींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा

सोनई हत्याकांडातील 6 दोषींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा

२०१३ साली संपूर्ण राज्याला हादरवून टाकणाऱ्या सोनई तिहेरी हत्याकांड खटल्यातली सर्वच्या सर्व म्हणजेच 6 दोषींना न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची सुनावलीय. ऑनर किलिंगचा हा खटाल दुर्मिळातला दुर्मिळ असल्याचं सरकारी पक्षाचं म्हणणं कोर्टाने मान्य केलंय.

  • Share this:

20जानेवारी, नाशिक : २०१३ साली संपूर्ण राज्याला हादरवून टाकणाऱ्या सोनई तिहेरी हत्याकांड खटल्यातली सर्वच्या सर्व म्हणजेच 6 दोषींना न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची  सुनावलीय. दोषींना प्रत्येकी 20 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. हा दंड दोषींकडून वसूल केल्यानंतर, त्यातील 10 हजार रुपयांची रक्कम पीडितांच्या कुटुंबीयांना दिली जाईल. ऑनर किलिंगचा हा खटाल दुर्मिळातला दुर्मिळ असल्याचं सरकारी पक्षाचं म्हणणं कोर्टाने मान्य केलंय. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सरकारी पक्षाची बाजू  मांडली आहे.  1 जानेवारी 2013 रोजी अहमदनगरमधील सोनई जवळच्या नेवासा फाटा इथं हे हत्याकांड घडलं होतं.

प्रेमप्रकरणातून 3 जणांची हत्या करण्यात आली होती. दोषी आरोपींनी सचिन सोहनलाल घारु (वय 23),संदीप राजू धनवार(वय 24) आणि राहुल कंडारे (वय 26,तिघे राहणार गणेशवाडी, सोनई,तालुका नेवासा) या तिघांची हत्या केली होती.

गेल्या सुनावणीत नाशिक सेशन्स कोर्टानं ७ पैकी ६ आरोपींना दोषी ठरवलं होतं, तर अशोक फलके हा आरोपी निर्दोष सुटला होता. २०१३च्या जानेवारी महिन्यात नेवासा फाटा इथं ३ तरुणांची क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. ऑनर किलिंगच्या प्रकारातून हे हत्याकांड झालं होतं.

 

काय आहे सोनई हत्याकांड ?

- जानेवारी 2013मध्ये 3 तरुणांची हत्या

- उच्चवर्णीय मुलीवर प्रेम केलं म्हणून हत्या केल्याचा आरोप

- मृतांची नावं - संदीप धनवार, राहुल कंडारे, सचिन घारू

- तीनही मृत व्यक्ती त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानमध्ये कामाला होते

- धनवार आणि कंडारेंचे मृतदेह कोरड्या विहिरीत पुरले

- घारूंच्या मृतदेहाचे तुकडे करून कूपनलिकेत टाकले

- विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकमांची नियुक्ती

- नेवासा सेशन्स कोर्टात खटला सुरू झाला

- नंतर खटला नाशिक सेशन्स कोर्टाकडे हस्तांतरित

- साक्षीदारांवर दबाव येऊ नये यासाठी खटला नाशिक कोर्टात

- एकूण 53 साक्षीदारांची साक्ष नोंदवली

 

या सहा दोषींना फाशीची शिक्षा 

- प्रकाश दरंदले

- रमेश दरंदले 

- पोपट दरंदले 

- गणेश दरंदले 

- अशोक नवगिरे 

- संदीप कुऱ्हे 

 

First published: January 20, 2018, 11:25 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading