News18 Lokmat

भूपेन हजारीकांचा मुलगा 'भारतरत्न' स्वीकारणार नाही,सरकारला धक्का?

तेज हजारीका यांच्या या भूमिकेमुळे सरकार समोर नवा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.

News18 Lokmat | Updated On: Feb 11, 2019 09:41 PM IST

भूपेन हजारीकांचा मुलगा 'भारतरत्न' स्वीकारणार नाही,सरकारला धक्का?

नवी दिल्ली 11 फेब्रुवारी : आसाम सरकारच्या नागरिकत्वाच्या विधेयकावरचा वाद चिघळतो आहे. ज्येष्ठ संगीतकार भूपेन हजारिका यांना सरकारने मरणोत्तर 'भारतरत्न' पुरस्कार जाहीर केला होता. मात्र नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधात हा पुरस्कार स्वीकारणार नाही असं त्यांचे पुत्र तेज हजारीका यांनी म्हटलं आहे. त्यामुळे सरकार समोर नवा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.


तर काही दिवसांपूर्वीच आसामच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विधेयकावर काँग्रेस अपप्रचार करत असल्याची टीका केली होती. आपण नेहमीच आसामच्या लोकांसोबत आहोत असं तेज हजारीका यांनी म्हटलं आहे.


प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारतरत्न पुरस्कारांची घोषणा केली होती. माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात आलंय. त्याचबरोबर जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि जनसंघाचे नेते नानाजी देशमुख आणि ज्येष्ठ संगितकार भुपेन हजारिका यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.

Loading...


राष्ट्रपती भवनाने शुक्रवारी रात्री एक पत्रक काढून ही घोषणा केली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने तीन भारतरत्न पुरस्कारांची घोषणा करून पुन्हा एकदा आश्चर्याचा धक्का दिलाय. प्रणव मुखर्जी हे गेल्या पाच दशकांपासून अधिक काळ देशाच्या राजकारणात आहे.


भुपेन हजारिका


आसमी संगीत जगभर पोहोचवत चित्रपट सृष्टीला अनेक अजरामर गीतं देण्याचं काम भुपेन दा यांनी केलं. आसाम जिल्ह्यातल्या तिनसुखीया जिल्ह्यात  8 सप्टेंबर 1926 ला त्यांचा जन्म झाला. गीतकार, संगीतकार आणि गायक म्हणून त्यांनी चित्रपट सृष्टीवर आपली अमीट छाप सोडली.


फक्त आसमीच नाही तर त्यांनी हिंदीसहीत अनेक भारतीय भाषांमधली त्यांची गाणी प्रचंड गाजली. "दिल हूम हूम करे" आणि "ओ गंगा तू बहती है क्यों" ही त्यापैकी महत्त्वाची गाणी. 5 नोव्हेंबर 2011ला त्यांचं निधन झालं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 11, 2019 09:34 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...