• Home
 • »
 • News
 • »
 • news
 • »
 • आई-बहिणीचा होणारा छळ नाही बघवला; पॅरोलवर सुटलेल्या बापाचा खेळ खल्लास

आई-बहिणीचा होणारा छळ नाही बघवला; पॅरोलवर सुटलेल्या बापाचा खेळ खल्लास

Murder in Buldhana: गावातील एका व्यक्तीच्या हत्या प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या व्यक्तीची पॅरोलवर सुटका झाल्यानंतर त्याच्याच मुलाने निर्घृण हत्या (Son killed father) केल्याची घटना उघडकीस आली आहे.

 • Share this:
  बुलडाणा, 25 ऑक्टोबर: गावातील एका व्यक्तीच्या हत्या प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या व्यक्तीची पॅरोलवर सुटका झाल्यानंतर त्याच्याच मुलाने निर्घृण हत्या (Son killed father) केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपी तरुणाने आपल्या एका मित्राच्या मदतीने बापाला लाकडी दांड्याने आणि तीक्ष्ण हत्याराने वार (Attack with sharpen weapon) करत निर्घृणपणे संपवलं आहे. पहाटे गस्तीवर असणाऱ्या पोलिसांना मृतदेह आढळल्यानंतर, ही  घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास केला असता, ही हत्या मृत व्यक्तीच्या मुलानेच केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी आरोपी मुलासह त्याच्या एका साथीदाराला अटक (Accused son and his friend arrested) केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. संगीत इंगळे असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव असून तो बुलडाणा जिल्ह्याच्या संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथील रहिवासी आहे. मृत संगीत इंगळे याने दहा वर्षांपूर्वी गावातील एका व्यक्तीची हत्या केली होती. यामुळे गेल्या काही वर्षांपासून संगीत हा तुरुंगात शिक्षा भोगत होता. पण अलीकडेच तो पॅरोलवर तुरुंगातून बाहेर आला होता. दरम्यान घरी आल्यानंतर, मृत संगीत याने दारुच्या पैशांसाठी आपल्या पत्नीला आणि मुलींना शिवीगाळ करत मारहाण केली होती. हेही वाचा-23 व्या वर्षी केली 40 रुपयांची चोरी; 42 वर्षांनंतर कोर्टाकडून निर्दोष सुटका गेल्या काही दिवसांपासून आपल्या पत्नीसह मुलींवर अमानुष अत्याचार करत होता. याच रागातून विपुल संगीत इंगळे याने आपल्या 49 वर्षीय बापाची निर्घृण हत्या केली आहे. दारू पिऊन मारहाण करणाऱ्या बापाच्या त्रासाला कंटाळून विपुलने वडिलांनी लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली आहे. या बेदम मारहाणी वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर आरोपीनं आपला मित्र राजेश भाटकर याच्या मदतीने मृतदेह चादरीत गुंडाळून मृतदेह गावाबाहेर आणून टाकला. हेही वाचा-12 वर्षाच्या मुलीने थेट पोलीस अधिकारी वडिलांचाच केला खून; कारण ऐकून चक्रावून जाल संग्रामपूर ते वरवट मार्गावर पहाटे गस्तीवर असणाऱ्या तामगाव पोलिसांना मधुकर बकाल यांच्या शेताजवळ संगीत इंगळे याचा मृतदेह सापडला होता. याप्रकरणी पोलिसांनी तपास केला असता, पोलिसांना मुलगा विपुलवर हत्येचा संशय आला. पोलिसांनी आरोपी मुलगा विपुलला ताब्यात घेत, कसून चौकशी केली असता, त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. या घटनेचा पुढील तपास तामगाव पोलीस करत आहेत.
  Published by:News18 Desk
  First published: