नवरा-बायकोच्या भांडणात 1 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, रागात बऱ्याच वेळा जमिनीवर फेकलं!

नवरा-बायकोच्या भांडणामध्ये एक वर्षाचा खून झाल्यामुळे लोकांनी यावर संताप व्यक्त केला आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 12, 2019 02:13 PM IST

नवरा-बायकोच्या भांडणात 1 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, रागात बऱ्याच वेळा जमिनीवर फेकलं!

साहेबराव कोकणे, प्रतिनिधी

अहमदनगर, 12 जुलै : दारूच्या नशेत घरात झालेल्या भांडणातून पित्याने अवघ्या एका वर्षाच्या चिमुरड्याचा खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नगरमधील तपोवन रोड परिसरात रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेमुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.

नवरा-बायकोच्या भांडणामध्ये एक वर्षाचा खून झाल्यामुळे लोकांनी यावर संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणी शुक्रवार (दि.12) सकाळी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे. चिराग सोहम कुमावत हे मयत चिमुरड्याचं नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिरागचे वडील सोहम कुमावत आणि आई अर्चना कुमावत हे तपोवन रोड परिसरात राहतात. ते मूळचे राजस्थान येथील रहिवासी आहेत. नगर शहरात फरशी बसवण्याचं काम करीत असल्याने तात्पुरत्या स्वरूपात ते नगरमध्ये राहत होते.

सोहम गुरुवारी रात्री उशिरा दारूच्या नशेत घरी आला. त्यावेळेस पत्नी अर्चना हिच्यासोबत त्याचं कडाक्याचे भांडण झालं. या भांडणात त्याने रागाच्या भरात पत्नी आणि मुलाला मारहाण सुरू केली. मुलाला बऱ्याच वेळा उचलून खाली फेकलं. त्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.

Loading...

हेही वाचा : श्रीदेवींचा अपघाती मृत्यू नाही तर खूनच, IPS अधिकाऱ्याचा पुराव्यासकट दावा

गंभीर जखमी झालेल्या चिरागला आई अर्चनाने उपचारासाठी तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. पण त्यावेळी डॉक्टरांनी चिरागचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. चिमुरड्याचा मृत्यू झाल्याचं समजताच तिने हॉस्पिटलमध्येच हंबरडा फोडला.

याप्रकरणी पहाटेच्या सुमारास तोफखाना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आज सकाळी चिरागची आई अर्चना कुमावत ही तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी दाखल झाली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा अधिक तपास सुरू आहे.

Zomato डिलीव्हरी बॉयला रॉडने बेदम मारहाण, हॉटेल मालकाचा VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 12, 2019 02:13 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...