Home /News /news /

धक्कादायक! प्राध्यापक मुलाच्या आत्महत्येनंतर वडिलांनीही उचललं टोकाचं पाऊल

धक्कादायक! प्राध्यापक मुलाच्या आत्महत्येनंतर वडिलांनीही उचललं टोकाचं पाऊल

अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे.

शिर्डी, 4 जुलै: अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. मुलाने गळफास लावून आत्महत्या केल्यानंतर काही वेळाने बापानेही स्वतःला गळफास लावून घेतला. कोपरगाव शहराजवळील संजिवनी साखर कारखाना परीसरात हि धक्कादायक घटना घडली आहे. 3 जुलैच्या मध्यरात्री राहुल संजय फडे (वय 27 वर्षे) या तरूणाने आपल्या घरातील पंख्याला गळफास लावून घेत आत्महत्या केली. मुलाने आत्महत्या केल्याने त्याच्या वडीलांसह कुटूंबाला मोठा धक्का बसला. हेही वाचा...हाहाकार! नाल्याच्या पुरात बैलगाडी गेली वाहून, नातू आणि आजोबासह चौघांचा मृत्यू मुलाचा मृतदेह उतरवून दवाखान्यात नेल्यानंतर पहाटेच्या दरम्यान वडील संजय रंगनाथ फडे (वय 50) यांनीही स्वतःला गळफास लावून घेत आपलं जीवन संपवलं आहे. किरकोळ वादातून मुलाने आत्महत्या केल्यानंतर बापानेही आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी दोघांचे मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठवले आहेत. मिळालेली माहिती अशी की, कोपरगावातील शिंगणापूर हद्दीतील संजीवनी कारखाना पेट्रोल पंपासमोर ही घटना घडली. मुलगा राहुल हा एका शैक्षणिक संस्थेत लॅब असिस्टंट म्हणून नोकरी करत होता. त्याचं दोन वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. त्याला एक दीड वर्षाचा मुलगा आहे. हेही वाचा...पिंपरी चिंचवडमध्ये जिम ट्रेनरची हत्या, नऊ जणांनी कोयत्याने केले सपासप वार सध्या आकस्मात मृत्यूची नोंद कोपरगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस तपासानंतर दोघांच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होणार आहे. मात्र, बाप लेकाने आत्महत्या केल्याने त्याच्या कुटूंबीयांना मोठा धक्का बसला असून परिसरात शोककळा पसरली आहे.
First published:

Tags: Ahamadnagar crime, Crime, Crime case

पुढील बातम्या