'तुला कापून टाकीन' अशी धमकी देणाऱ्या महाराजांनी मागितली तृप्ती देसाईंची माफी

'तुला कापून टाकीन' अशी धमकी देणाऱ्या महाराजांनी मागितली तृप्ती देसाईंची माफी

अकोल्यातील सोमनाथ महाराज भोर यांनीही फोन करुन धमकी दिली होती. याबाबत तृप्ती देसाई यांनी मुख्यमंत्री कार्यालयाकडे ईमेलद्वारे तक्रार दाखल केली होती.

  • Share this:

अकोला, 23 फेब्रुवारी : भूमात ब्रिगेडच्या कार्यकर्त्या तृप्ती देसाईंना फोनवरून कापून टाकण्याची धमकी देणाऱ्या सोमनाथ भोर महाराजांनी अखेर माफी मागितली आहे. अकोले येथील सोमनाथ भोर महाराज यांनी तृप्ती देसाईंची माफी मागितली आहे. माझ्या फोनवरील वक्तव्याशी इंदोरीकर महाराजांचा संबंध नाही. माझा राग अनावर झाल्याने मी बोललो. माझ्या संभाषणाने त्यांच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो. अशा शब्दात सोमनाथ भोर यांनी माफी मागितली आहे.

कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भूमात ब्रिगेडच्या कार्यकर्त्या तृप्ती देसाई आक्रमक झाल्या होत्या. निवृत्ती देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज यांच्याविरोधात पीसीपीएनडीटी कायद्यानुसार कारवाई झाली नाही तर आपण इंदोरीकर यांच्या अकोल्यात जाऊन त्यांना काळे फासू असा इशारा दिला होता. त्यांच्या या वक्तव्यामुळे मोठा गदारोळ झाला होता.

तृप्ती देसाई यांना अनेक धमक्यांचे फोन करण्यात आले होते. अकोल्यातील सोमनाथ महाराज भोर यांनीही फोन करुन धमकी दिली होती. याबाबत तृप्ती देसाई यांनी मुख्यमंत्री कार्यालयाकडे ईमेलद्वारे तक्रार दाखल केली होती. 21 फेब्रुवारी सकाळी पुण्यातील धनकवडी इथे राहत्या घरी सोमनाथ महाराज भोर यांचा फोन आल्याचं तृप्ती देसाईंनी सांगितलं.

सोमनाथ महाराजांनी अश्लिल शिवीगाळ केली. 'तू जर इंदुरीकर महाराजांच्या विरोधातील तक्रार मागे घेतली नाही तर तू अकोल्यात ये, तुला कापूनच टाकतो. तू कुत्री आहेस, नालायक आहेस' असं म्हणून 'तुझी पैदास कुठली आहे. तू एका बापाची पैदास नाहीस. तू महिला नाही तर हिजडा आहेस' अशा खालच्या पातळीवर जात शिवीगाळ केल्याचं देसाईंनी म्हटलं होतं.

‘मला कापून टाकण्याची भाषा हे महाराज करीत असल्यामुळे माझ्या आणि माझ्या कुटुंबीयांच्या जीविताला पुन्हा एकदा इंदोरीकर आणि त्यांच्या समर्थकांकडून धोका निर्माण झालेला आहे. यासंदर्भात पुण्यातील सहकारनगर पोलीस स्टेशन येथे मेलद्वारे त्यांनी तक्रार दाखल केली होती’ असे तृप्ती देसाईंनी सांगितलं होतं.

नेमकं इंदोरीकर महाराज काय बोलले ?

'स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग जर अशीव वेळेला झाला तर ती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत मिळवणारी होतात. जर टाईमिंग हुकला की क्वालिटी खराब असं सांगत, पुलश्य नावाच्या ऋषींनी कैकसी नावाच्या स्त्रीशी सूर्य अस्ताला जाताना संग केला तर रावण, बिभीषण, कुंभकर्ण जन्माला आला तर आदिती नावाच्या ऋषीने पवित्र दिवशी संग केला तर त्याच्या पोटी हिराण्यक्ष नावाचा राक्षस जन्माला आला हिरण्यकक्षपूने नारायण म्हणून संग केला तर भक्त प्रल्हाद जन्माल आला.' असं इंदोरीकर महाराज आपल्या कीर्तनादरम्यान म्हटले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 23, 2020 07:52 AM IST

ताज्या बातम्या