फक्त एका दोरीनं केली माय लेकरांची मृत्यूच्या दाढेतून सुटका

फक्त एका दोरीनं केली माय लेकरांची मृत्यूच्या दाढेतून सुटका

निष्काळजीपणामुळे पाण्यात उतरलेल्या मायलेकांचा जीव थोडक्यात वाचला. स्थानिक तरुणांनी पाण्यात दोरी फेकली नसती तरी या पर्यटकांच्या आयुष्याचा दोर कापला गेला असता.

  • Share this:

अनिस शेख, मावळ 18 ऑगस्ट : पावसाळ्यात पर्यटनासाठी बाहेर पडणाऱ्यांची संख्या मोठी असते. आकाशातून रिप रिप पडणारा पाऊस, चोहिकडे हिरवीगार पसरलेली चादर, खळ खळ वाहणारे झरे, नदी, नाले आणि सोबतीला थंडगार वारा यामुळे पावसाळी महिने पर्यटनासाठी उत्तम समजले जातात. मात्र पर्यटनाला धबधबे, नदी या ठिकाणी जाताना काही काळजी घ्यावी लागले. याचा विसर बहुतांश पर्यटकांना पडलेला असतो. याच निष्काळजीपणामुळे तळेगाव इथल्या प्रसिद्ध कुंडमळा इथं मायलेकांचा जीव थोडक्यात वाचला. स्थानिक तरुणांनी पाण्यात दोरी फेकली नसती तरी या पर्यटकांच्या आयुष्याचा दोर कापला गेला असता.

राष्ट्रवादीच्या या आमदाराचे राहुल गांधींना आवाहन, म्हणाले अजूनही वेळ गेली नाही!

मावळ तालुक्यातील तळेगाव येथील प्रसिद्ध कुंडमळा याठिकाणी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी हजारो पर्यटक येथे येत असतात परंतु अनेकदा स्टंटबाजी करताना अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देहूरोड येथून पर्यटनासाठी एकाच कुटुंबातील चार जण कुंडमळा इतं आले होते. पाण्याचा वेग जास्त असल्याने पाण्यात उतरू नका असं प्रशासनाने वारंवार सांगितलं होतं. मात्र याकडे दुर्लक्ष करत एक महिला आपल्या दोन मुलांसह पाण्यात उतरली आणि प्रवाहास ओढली गेली.

धक्कादायक.. अर्थमंत्र्यांच्या चंद्रपुरात 108 रुग्णवाहिकेतून अवैध दारूची तस्करी

एक महिला तिच्या दोन लहान मुलांसह पाण्यात पडल्याची माहिती मिळताच आजूबाजूच्या पर्यटकांनी तिला व तिच्या मुलांना वाचवण्यासाठी आरडाओरडा सुरू केला. गावातील तरुणांना घटनेची माहिती मिळतात आठ ते दहा तरुणांनी एक मोठा दोरखंड पाण्यात फेकला आणि काही जणांनी पाण्यात उड्या घेतल्या. दोरखंडाच्या मदतीने  पाण्यात बुडणार्‍या महिलेचा जीव काही तरुणांनी वाचवला.

'राहुल गांधी...पुढे येऊन फॅसिझमविरुद्ध लढा', जितेंद्र आव्हाड यांचं आवाहन

तर वाहत्या पाण्यात उडी मारून राजू पारधी या तरुणाने तिच्या दोन मुलांना पाण्यातून बाहेर काढले मृत्यूच्या दाढेतून बाहेर आल्यानंतर महिला तसेच तिच्या सोबत आलेल्या तिच्या कुटुंबातील लोकांनी क्षणभरात घराकडे जाणारा रस्ता धरला. अनेक वेळा प्रशासनाकडून धोक्याची सूचना देण्यात आली होती. तसच याठिकाणी धोकादायक ठिकाण असल्याचे फलक लावल्यानंतरही पर्यटक अतिउत्साने आपला जीव धोक्यात घालून पर्यटन करत असतात. अशा हुल्लडबाजी पर्यटकांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी पोलिस प्रशासनाला केली आहे.

First published: August 18, 2019, 5:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading