Online व्यवहार करणार असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अकाऊंट होईल खाली

Online व्यवहार करणार असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अकाऊंट होईल खाली

बँकेशी संलग्न असलेल्या कुठल्याही खात्याची माहिती ही फोनवर कुणालाही देऊ नका अशा वारंवार सूचना केल्यानंतर ही नागरिकांकडून त्या गांभीर्याने घेतल्या जात नाहीत.

  • Share this:

वैभव सोनवणे, पुणे 28 डिसेंबर : सध्याचा जमाना हा डिजिटलचा असल्याने ऑनलाईन व्यवहार वाढले आहेत. असे व्यवहार वाढल्यानंतर Paytm, GooglePay आणि असंख्य ऑनलाईन वॉलेटच्या माध्यमातून सध्या मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार सुरु आहेत. केलेत मात्र या बाबतच पुरेस ज्ञान नसल्याने फसवणुकीच्या अनेक घटना समोर येताहेत. त्यामुळे ऑनलाईन व्यवहाराच्या फसवणुकीचे बळी ठरण्यापूर्वी त्याबाबतची पूर्ण माहिती करून घेणं आवश्यक आहे. त्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुण्याच्या गायत्री सातपुते यांचे 15 हजार रुपये पेटीएम च्या केवायसी पूर्ण करण्याच्या नावाखाली लंपास झाल्याची घटना घडलीय. गायत्री यांच्या मोबाईलवर पेटीएम ने केवायसी पूर्तता करण्यासाठीचा मेसेज पाठवला असून ती माहिती देण्यासाठी कॉल करावा अशा अशयाचा मेसेज त्यांना आला होता.

त्यांनी कुठलीही खातरजमा न करता संपर्क केला आणि फोन वर बोलत असलेल्या व्यक्तीला त्याच्या सांगण्यानुसार दिलेल्या नंबरवर पैसे ट्रान्स्फर केले. पुढच्या काही क्षणातच त्यांच्या पेटीएमशी संलग्न असलेल्या बँक खात्यातून 15 हजार रुपये लंपास झाल्याचा मेसेज त्यांना मिळाला. याचं कारण होतं त्यांना आलेला मेसेज पेटीएम कडून आलाच नव्हता. तो होता ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या टोळीचा.

ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, नव्या वर्षात बदलणार नियम

बँकेशी संलग्न असलेल्या कुठल्याही खात्याची माहिती ही फोनवर कुणालाही देऊ नका अशा वारंवार सूचना केल्यानंतर ही नागरिकांकडून त्या गांभीर्याने घेतल्या जात नाहीत किंवा अपुऱ्या माहिती मुळे त्यांची मोठी फसवणूक होते. पुणे सायबर पोलिसांकडे रोज अशा प्रकारच्या अनेक तक्रारी येत असतात. त्यामुळे पूर्ण खबरदारी घेण्याच्या सूचना पोलिसांनी केल्या आहेत.

Employee Provident Fund : 25 हजार रुपयांच्या बेसिक पगारात मिळवा 1 कोटी रुपये

बँक किना ऑनलाईन वॉलेट कंपनी या कधी फोनवर किंवा मेल व मेसेजच्या माध्यमातून तुमच्या बँकेची गोपनीय माहिती अथवा व्यवहाराच्या वेळी येणारा ओटीपी विचारत नाहीत. त्यामुळे कुणीही अशी विचारपूस केल्यास तिथेच तुम्ही सावधान व्हा. नाहीतर तुमची फसवणूक होऊन तुमचं अकाऊंट खाली होण्याची शक्यता असते.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 28, 2019 11:46 AM IST

ताज्या बातम्या