कुख्यात गुंडाला मारण्याचा शार्प शूटरचा प्लॅन पोलिसांनी उधळला; पिस्तुल, स्क्रू ड्रायव्हर, सत्तूर ताब्यात

कुख्यात गुंडाला मारण्याचा शार्प शूटरचा प्लॅन पोलिसांनी उधळला; पिस्तुल, स्क्रू ड्रायव्हर, सत्तूर ताब्यात

भैय्या पवार हा गणेशोत्सवासाठी सोलापूरमध्ये येणार असल्याने सरजी गँगचं चार शूटर सोलापुरात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसारच आरोपींनीही कबुली जबाब दिला आहे.

  • Share this:

पंढरपूर, 14 सप्टेंबर : पंढरपुरातील गँगवॉर पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचं पाहायला मिळालं आहे. पंढरपुरातील कुख्यात गुंड भैय्या पवार याचा खून करण्यासाठी सोलापुरात आलेल्या चौघांना विजापूर नाका पोलिसांनी अटक केली आहे तर आणखी दोन आरोपींनी पलायन केल्याची माहिती पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिली आहे. सोमनाथ खंकाळ, विजय कबाडे, प्रशांत धोत्रे, नरेश घोरपडे अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत.

भैय्या पवार हा गणेशोत्सवासाठी सोलापूरमध्ये येणार असल्याने सरजी गँगचं चार शूटर सोलापुरात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसारच आरोपींनीही कबुली जबाब दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सोलापुरातील आरटीओ कार्यालयाजवळ असलेल्या एका फ्लॅटमध्ये धाड टाकली असता 4 आरोपींसह त्यांच्याकडे दोन पिस्तुल, चार जिवंत काडतुसं, दोन सत्तूर, दोरखंड, मिरची पुडी, स्क्रू ड्रायव्हर आणि दोरखंड असं साहित्य आढळून आलं. त्यांच्याकडून दोन मोबाईल आणि चार मोटारसायकली असा एकूण 3 लाख 33 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दरम्यान, या 4 आरोपींना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे जिल्हाभरात मोठी खळबळ माजली आहे. तर या 4 आरोपींकडे पिस्तूल आणि जिवंत काडतूसं कशी आली याचा आता पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून गुन्ह्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. बीडमध्येही हृदय पिळवटून टाकणारी एक घटना घडली आहे. एका 20 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली आहे.

इतर बातम्या - खळबळजनक! भर रस्त्यात लेकराचा झाला खून, मृतदेहाला पाहून आईचा आक्रोश

गेवराई तालुक्यातील नागझरी इथे युवकाची भर दिवसा हत्या झाल्याचा प्रकार समोर आला आहे. 20 वर्षीय युवकाची भरदिवसा हत्या करण्यात आल्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घरातल्या तरुण मुलाला अशा प्रकार गमावल्यामुळे मृतदेहावर पडून नातेवाईकांनी आक्रोश केला आहे. ह्दय पिळवटून टाकणारी ही घटना बीड जिल्ह्यात घडली आहे. जुन्या वादातून तरुणाची हत्या झाली असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

इतर बातम्या - साता जन्माचं वचन दिलेल्या पतीची निर्घृण हत्या, पोलिसांना फोनवर पत्नी म्हणते...!

मिळालेल्या माहितीनुसार, संजय काकासाहेब चव्हाण असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव होतं. काही अज्ञातांनी त्याची हत्या केल्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला. स्थानिकांनी तरुणाला तात्काळ जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केलं पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. संजयच्या अशा जाण्यामुळे त्याच्या संपूर्ण कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे तर परिसरात शोककळा पसरली आहे.

इतर बातम्या - उदयनराजेंनी का केला भाजपमध्ये प्रवेश? राजू शेट्टींनी सांगितलं खरं कारण...!

या संपूर्ण प्रकाराची गेवराई पोलिसांना माहिती देण्यात आली पण अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचं सांगण्यात येत आहे. तर संजयचा नेमका खून का झाला याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. नागझरी येथील पारदी वस्तीवर ही घटना घडली आहे. याच ठिकाणी दीड महिन्यापूर्वी अशीच किरकोळ भांडणातून एकाची हत्या केली गेली होती. दोन महिन्यातील ही दुसरी घटना आहे.

SPECIAL REPORT : महाजनादेश यात्रेसाठी पोस्टर लावण्यावरून भाजप आमदार आणि इच्छुकांमध्ये हाणामारी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 14, 2019 09:46 PM IST

ताज्या बातम्या