सोलापूर जिल्ह्यातली ऊस दराची कोंडी फुटली ; एफआरपी+400चा भाव मिळणार

सोलापूर जिल्ह्यातली ऊस दराची कोंडी फुटली ; एफआरपी+400चा भाव मिळणार

सोलापूर जिल्ह्यातील ऊस दराची कोंडी अखेर फुटलीय. ऊस उत्पादकांना FRP + 300 रुपये पहिली उचल आणि एक महिन्यानंतर 100 असा एकूण FRP + 400 दर निश्चित करण्यात आलाय.

  • Share this:

21 नोव्हेंबर, सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ऊस दराची कोंडी अखेर फुटलीय. ऊस उत्पादकांना FRP 300 रुपये पहिली उचल आणि एक महिन्यानंतर 100 असा एकूण FRP 400 दर निश्चित करण्यात आलाय. दहा दिवसाच्या आंदोलनानंतर ऊस दरावर हा तोडगा निघालाय. सहकारमंत्र्यांच्या मध्यस्तीनंतर हा तोडगा निघालाय. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल साखर कारखान्याने हा तोडगा मान्य केल्याने त्यांच्या कारखान्याविरोधातलं आंदोलन स्थगित केल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी सांगितलंय.

लोकमंगल कारखाना सोडून इतर कारखानादारांची भूमिका मात्र, अजूनही संदिग्धच आहे. त्यांच्याकडून या फार्म्युल्याबाबत अजून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील इतर साखर कारखान्यांविरोधातही शेतकरी संघटना आंदोलन करणार का हे पाहावं लागणार आहे. बळीराजा शेतकरी संघटना मात्र आंदोलनावर ठाम आहे. सोलापूर एकूण 25 साखर कारखाने आहेत. त्यामुळे इतर कारखाने खरंच एवढा दर देणार का आणि समजा नाही दिला तर शेतकरी संघटना पुन्हा आंदोलन हाती घेणार का, हे येत्या आठवड्याभरातच स्पष्ट होणार आहे.

First published: November 21, 2017, 6:59 PM IST

ताज्या बातम्या