सोलापूर, 22 एप्रिल : सोलापूरच्या पालकमंत्रिपदावरून बदल करण्यात आले आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे पालकमंत्रिपद सोपवण्यात आले होते. परंतु, आव्हाड रुग्णालयात दाखल झाल्यामुळे त्यांच्याऐवजी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून नियुक्ती सत्र सुरूच आहे. कारण एकाच महिन्यात 3 जणांची पालकमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची काही दिवसांपूर्वीच पालकमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली होती. परंतु, आव्हाड हे मुंबई क्वारंटाइन झाले आहे. तसंच सध्या ते रुग्णालयात दाखल झाले आहे. कोरोनासारख्या परिस्थितीत जिल्ह्यात पालकमंत्रिपदी आव्हाड नसल्यामुळे नव्याने नियुक्तीचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे नव्याने आदेश काढत जितेंद्र आव्हाड यांना हटवत पालकमंत्रिपदी दत्तात्रेय भरणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
हेही वाचा -डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्यांची आता खैर नाही, नरेंद्र मोदींनी घेतला मोठा निर्णय
विशेष म्हणजे, दत्ता भरणे यांच्या रूपाने अजित पवारांनी सोलापूर जिल्ह्याचं राजकारण हे आपल्या अधिपत्याखाली घेतले असं बोललं जात आहे. कारण, सोलापूर राष्ट्रवादीत शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट आहेत. अशातच मोहिते-पाटील, सोपल, बांदल असे विविध गटं भाजप, सेनेत गेल्यामुळे राष्ट्रवादी पक्षाची जिल्ह्यात बऱ्यापैकी पडझड झालेली आहे. त्यामुळे कोरोनाचे निमित्ताने सोलापूरच्या पालकमंत्रिपदी दत्तात्रेय भरणेंची नियुक्ती झाल्यामुळे अजित पवारांचा मर्जीतला माणूस आला आहे.
हेही वाचा - नवी मुंबईतील आयटी कंपनीतून आली धक्कादायक बातमी, आरोग्य प्रशासन हादरलं
अशीही चर्चा आहे की, माढ्यातून पवारांना सोलापूरकरांनी नाकारल्याने त्यांनी जिल्ह्याला एकही मंत्रिपद दिले नाही. तसंच जिल्ह्याची सुत्रे आपल्या गटाकडेच राहावीत, यासाठी आपल्या गटाचे मंत्री पालकमंत्री म्हणून निवडले होते. अजित पवारांनी मोठ्या पवारांना चांगलेच चेकमेट केल्याचीही चर्चा आहे.
संपादन - सचिन साळवे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.