सोलापुरात ऊस आंदोलन पुन्हा पेटलं, सहकारमंत्र्यांचा कारखाना पाडला बंद !

सोलापूर जिल्ह्यात ऊस दराची कोंडी न फुटल्याने सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आता आणखी आक्रमक झालेत. आंदोलक शेतकऱ्यांनी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची मालकी असलेल्या लोकमंगल उद्योग समुहाचा बीबी दारफळमधला साखर कारखानाच बंद पाडलाय.

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Nov 20, 2017 04:04 PM IST

सोलापुरात ऊस आंदोलन पुन्हा पेटलं, सहकारमंत्र्यांचा कारखाना पाडला बंद !

20 नोव्हेंबर, सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात ऊस दराची कोंडी न फुटल्याने सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आता आणखी आक्रमक झालेत. आंदोलक शेतकऱ्यांनी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची मालकी असलेल्या लोकमंगल उद्योग समुहाचा बीबी दारफळमधला साखर कारखानाच बंद पाडलाय. जनहित शेतकरी संघटनेचे संतप्त कार्यकर्ते थेट साखर कारखान्याच्या गव्हाणीत घुसलेत. लोकमंगल साखर कारखान्याच्या गव्हाणीत घुसून जनहित शेतकरी संघटनेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी साखरेचे गाळप बंद पाडलंय. गेल्या पाच दिवसापासून जनहित शेतकरी संघटनेचे नेते प्रभाकर देशमुख यांनी ठिय्या आंदोलन सुरु केलेय. मात्र सहकारमंत्री कोणत्याही प्रकारची दखल न घेता गाळप सुरु ठेवल्याने कार्यकर्ते संतप्त झालेत.

काल भंडारकवठ्यामध्येही बळीराजा आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलन करून सहकारमंत्र्यांचा दुसरा साखर कारखानाही बंद पाडलाय. त्यामुळे सहकारमंत्री सुभाष देशमुख सोलापूर जिल्ह्यात ऊस दर आंदोलनावरून पुरते अडचणीत आलेत. त्यांनीही ऊस दराबाबत हतबलता व्यक्त करत सरळ शासनाकडे अंगुलीनिर्देश दाखवलाय. दरम्यान, जिल्ह्यातील इतर साखर कारखानदारांचे साखर कारखाने मात्र, सुरळीतपणे सुरू आहेत. तिथं कोणतंही आंदोलन होताना दिसत नाही त्यामुळे या ऊसदराच्या आडून जाणिवपूर्वकपणे सहकारमंत्र्यांना तर टार्गेट केलं जात नाहीना अशी शंका सुभाष देशमुख समर्थकांकडून व्यक्त केली जातेय.

दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातला ऊस दराचा तिढा निकाली काढण्यासाठी स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी स्वतः येत्या 22 तारखेपासून जिल्ह्यात ठाण मांडून बसणार आहेत. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातलं आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 20, 2017 04:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...