सोलापूरात ऑनर किलिंग, आई वडिलांकडून मुलीची हत्या

सोलापूरात ऑनर किलिंग, आई वडिलांकडून मुलीची हत्या

पहाटे चारच्या सुमारास शेतातच तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कारही केले

  • Share this:

सोलापूर, २८ ऑक्टोबर २०१८- मंगळवेढा तालुक्यात सालगड्यासोबत प्रेमविवाह केल्याने सावत्र आई आणि वडिलांनी २२ वर्षीय बी.ए.एम.एस.चे शिक्षण घेणाऱ्या मुलीची हत्या केली. अनुराधा विठ्ठल बिराजदार असे त्या मुलीचे नाव असून वडील विठ्ठल धोंडिबा बिराजदार आणि सावत्र आई श्रीदेवी विठ्ठल बिराजदार यांना पोलिसांनी अटक केली आहे. अनुराधा कर्नाटकातील सिंदगी येथे बी.ए.एम.एस. चे शिक्षण घेत होती. वडिलांकडे सालगडी म्हणून काम करणाऱ्या मुलाने कर्नाटकात जाऊन तिथे प्रेमविवाह केला.

सालगड्याशी प्रेमविवाह करून मुलीनं माझी बदनामी केली असून मी तिला जीवंत ठेवणार नाही, असं म्हणत विठ्ठल घराबाहेर पडला. विठ्ठला जेव्हा ही घटना कळली तेव्हा अनुराधाला ते सिंदगी येथून तात्काळ सोलापूरला घेऊन आला. २ ऑक्टोबरला साधारणतः रात्री १.३० वाजता बोराळे गावातील फिर्यादी बाळासाहेब म्हमाणी यांच्याकडे अनुराधाला सोडले. यानंतर ४ तारखेला पुन्हा म्हमाणी यांच्याकडे जात, तिची तोंडी परीक्षा राहिली असल्याने तिला घेऊन जातो असे सांगत, विठ्ठल अनुराधाला इनोव्हा गाडीत बसवून घेऊन गेला.

शुक्रवारी सलगर येथे नेऊन आई- वडिलांनी तिची हत्या केली आणि पहाटे चारच्या सुमारास शेतातच तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कारही केले. मात्र अनुराधाने मरणापूर्वी दोन चिठ्या लिहून ठेवल्या होत्या. या चिठ्ठीत माझ्या जीवाला धोका असून आई- वडील मला मारण्याचा प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट लिहिले. तसेच जर माझे काही बरे- वाईट झाले तर त्याला पूर्णपणे आई- बाबा जबाबदार असतील असेही तिने नमूद केले आहे. या दोन चिठ्ठ्यांच्या आधारावर दोन्ही आरोपींनी अटक करण्यात आली असून दोघांची कसून चौकशी केली जात आहे.

गडकरी म्हणतात, 'पवारसाहेब कधी काय बोलतील आणि काय करतील याचा नेम नाही'

First published: October 6, 2018, 4:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading