सोलापूरचे भाजप खासदार अडचणीत, बनावट जातप्रमाणपत्र प्रकरणी याचिका दाखल

सोलापूरचे भाजप खासदार अडचणीत, बनावट जातप्रमाणपत्र प्रकरणी याचिका दाखल

लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी यांच्या उमेदवारीवर अपक्ष उमेदवार प्रमोद गायकवाड यांनी हरकत घेतली होती.

  • Share this:

सोलापूर,15 जानेवारी: सोलापूरचे भाजपचे खासदार डॉ.जयसिद्धेश्‍वर महास्वामी तथा नुरदय्यास्वामी गुरुबसप्पा हिरेमठ यांना बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणी नोटीस बजावण्यात आली आहे. खासदार. डॉ. जयसिद्देश्वर महास्वामी यांना ही नोटीस सोलापूर जिल्हा जात पाहाणी आणि पडताळणी समितीद्वारा बजावण्यात आली आहे. लोकसभा निवडणूक 2019 मध्ये डॉ.जयसिद्देश्वर महास्वामी हे भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार होते. निवडणूक आयोगाकडे उमेदवारी अर्ज दाखल करताना डॉ.जयसिद्देश्वर महास्वामी यांनी बनावट जात प्रमाणत जोडल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी रिपाइंचे प्रमोद गायकवाड यांनी आगोदर सोलापूर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे तक्रार आणि त्यानंतर मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती.

दरम्यान, सोलापूर जिल्हा जात पडताळणी, पाहणी समितीने खासदार डॉ. जयसिद्देश्वर महास्वामी यांना नोटीस बजावली आहे. या नोटीशीमध्ये आपल्या प्रमाणपत्राची सत्यता दिलेल्या मुदतीत पटवून द्यावी असे बजावण्यात आले आहे. त्यामुळे समितीच्या नोटीशीला खासदार जयसिद्धेश्‍वर महास्वामी काय उत्तर देतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

डॉ.जयसिद्धेश्‍वर महास्वामी तथा नुरदय्यास्वामी गुरुबसप्पा हिरेमठ यांचा बेडा जंगम जातीचा दाखला बनावट आहे. त्यांच्या शाळेच्या दाखल्यावर हिंदू लिंगायत असा उल्लेख असल्याचा दावाही तक्रारकर्त्यांनी केला आहे, असे तक्रारदार प्रमोद गायकवाड यांनी तक्रारीत म्हटले आहे.

मुंबई हाय कोर्टात प्रमोद गायकडवाड यांनी दाखल केलेल्या याचिकेत सोलापूर जिल्हाधिकारी, अक्कलकोट तहसीलदार, जात पडताळणी समिती सोलापूर, निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य यांचा देखील समावेश आहे. ही याचिका दाखल करुन घेतल्यावर मुंबई हायकोर्टाने प्रतिवादींना नोटीस पाठवण्याचे निर्देश दिले. तसेच, प्रतिवादींना 5 नोव्हेंबरपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देशही दिले.

उमेदवारीवर घेतला होता आक्षेप...

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी यांच्या उमेदवारीवर अपक्ष उमेदवार प्रमोद गायकवाड यांनी हरकत घेतली होती. मात्र, ही हरकत विचारात न घेता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जयसिद्धेश्वर महास्वामींचा अर्ज वैध ठरवला होता. सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव होता. त्यामुळे बेडा जंगम जातीचा दाखला सादर करत उमेदवार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी तथा नुरदय्यास्वामी गुरुबसप्पा हिरेमठ यांनी आपली उमेदवारी दाखल केली. मात्र, जातीच्या दाखल्यावर आक्षेप घेत गायकवाड यांनी हाय कोर्टात घाव घेतली आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: January 15, 2020, 9:54 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading