पिंपरी-चिंचवड, 10 फेब्रुवारी : महिलांवरील अत्याचाराचा कळस गाठणाऱ्या हिंगणघाट येथील घटनेबद्दल बोललं जातं असतांना पेशाने डॉक्टर असलेल्या पतीकडून सतत होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून एका 34 वर्षीय संगणक अभियंता महिलेने पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची दुर्दवी घटना घडल्याची बाब समोर येतीय पिंपरी शहरातील चिंचवड परिसरातल्या माणिक कॉलिनीतील पुष्पांगण अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली. या घटनेत मेघा पाटील ह्यांचा मृत्यू झालाय.
मेघाच्या वडिलांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारी नुसार मेघाचा पती आरोपी संतोष पाटील हा तिच्याकडे माहेरून 25 लाख रुपये आणण्यासाठी वारंवार तगादा लावत होता. शिवाय तिच्या दिसण्यावरूनही सतत तिचा मानसिक छळ करायचा ह्या सगळ्या त्रासाला कंटाळून अखेर मेघाने आत्महत्या करण्याचं टोकाच पाऊल उचललं आणि तिचा दुर्दवी मृत्यू झाला. दरम्यान ह्या घटने बाबत तक्रार दाखल होताच चिंचवड पोलिसांनी मेघाचा पतीसह सासू सासऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करत आरोपी पती डॉक्टर संतोष पाटील याला अटक केली आहे.
बीडमध्ये पीडित महिलेच्या कुटुंबीयांना मारण्याची धमकी
महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या सुमित वाघमारे हत्या कांडांतील पीडिता भाग्यश्री वाघमारेला केस मागे घेण्यासंबंधी धमक्या आणि दबाव टाकण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. जामीनावर सुटून आलेल्या आरोपींनी थेट केस मागे घ्या अन्यथा भाग्यश्री व सुमितच्या संपूर्ण कुटुंबाला संपवून टाकण्याची धमकी दिली.
यामुळे पीडित कुटुंबाने पोलीस स्टेशन मध्ये धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रार दाखल करते वेळी पोलिसांनी तक्रार दाखल न करता उलट आरोपींना फोन लावून माहिती दिल्याचा आरोप भाग्यश्री वाघमारे हिने केला. यामुळे आरोपींचा मुजोरपणा आणि पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
यापूर्वी बीड जिल्हा न्यायालयाच्या आवारात भाग्यश्रीला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी हा गंभीर प्रकार उघडकीस आला. आजही वाघमारे कुटुंब दहशतीखाली आहे. या कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. मात्र केस साठी न्यायालयात गावाकडून बीडला येताना अपघात घडवून मारतील अशी भिती सुमितचे वडील शिवाजी वाघमारे आणि आई सुनीता वाघमारे यांनी व्यक्त केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.