मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

अंगावर शहारे आणणारी घटना! सामाजिक कार्यकर्त्यानं स्वतःला घेतलं पेटवून

अंगावर शहारे आणणारी घटना! सामाजिक कार्यकर्त्यानं स्वतःला घेतलं पेटवून

कोल्हापूर जिल्ह्यातल्या इचलकरंजी शहरात आज अंगावर शहारे आणणारी घटना घडली.

कोल्हापूर जिल्ह्यातल्या इचलकरंजी शहरात आज अंगावर शहारे आणणारी घटना घडली.

कोल्हापूर जिल्ह्यातल्या इचलकरंजी शहरात आज अंगावर शहारे आणणारी घटना घडली.

कोल्हापूर, 26 ऑक्टोबर: कोल्हापूर जिल्ह्यातल्या इचलकरंजी शहरात आज (सोमवार) अंगावर शहारे आणणारी घटना घडली. इचलकरंजी शहरातील एका सामाजिक कार्यकर्त्यानं स्वतःला पेटवून घेतलं. नगरपालिकेच्या आवारात सोमवारी ही घटना घडली. नरेश भोरे असं या सामाजिक कार्यकर्त्याचं नाव आहे. त्यानं नगरपालिकेत स्वतःवर पेट्रोल ओतून पेटवून घेतलं. नरेश भोरे यांना तातडीनं सांगली येथील रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. दुसरीकडे नरेश भोरे यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिला आहे. हेही वाचा..ऊर्जामंत्री पोहोचले ग्राउंड झिरोवर, अधिकाऱ्यांना धरले चांगलेच धारेवर नरेश भोरे यांच्या निदर्शनास आली होती ही बाब.... मिळालेली माहिती अशी की, गेल्या आठवड्यात शहापूर रस्त्यावरुन मेलेले डुक्कर घंटागाडीतून नेण्याऐवजी चक्क घंटागाडीला बांधून रस्त्यावरुन ओढून नेले जात होते. हा प्रकार सामाजिक कार्यकर्ते नरेश भोरे यांच्या निदर्शनास आला होता. त्यांनी नागरिकांच्या आरोग्याचा विचार करुन, गाडीला मृत डुक्कर बांधून ओढत नेण्यास घंटागाडी चालकास अटकाव केला. त्यावरुन संबंधीत गाडीच्या चालकाने त्यांना शिवीगाळ करीत मारहाण केली होती. तसेच त्याच्यावर दहशत निर्माण करुन भोरे यांना चक्क मेलेले डुक्कर उचलून घंटागाडीत टाकण्यास भाग पाडलं होतं. याप्रकरणी कचरा उठाव करणार्‍या संबंधीत ठेकेदार व ठेका घेतलेल्या कंपनीवर पेटा अ‍ॅनिमल कायद्यातंर्गत कारवाई करावी. शिवीगाळ करुन मारहाण करणार्‍या संबंधीत घंटागाडीच्या चालकावर कारवाई करावी. या मागणीसाठी त्याने सोमवार 26 ऑक्टोबर रोजी नगरपालिकेसमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार भोरे यांनी सोमवारी दुपारी पेट्रोलची बाटली घेवून नगरपालिकेच्या इमारतीत प्रवेश केला. प्रवेश करताच त्याने स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेत पेटवून घेतले. या प्रकाराने नगरपालिका आणि पोलिसांमध्ये एकच धावपळ उडाली. त्यांच्या अंगाला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न केला पण यात ते भाजून गंभीर जखमी झाले आहेत. भोरे हे 50 टक्के भाजले गेले आहेत. हेही वाचा..माणसाच्या कवटीवर तब्बल 5 हजार वर्षांपूर्वी झाली होती मेंदूची शस्त्रक्रिया दिला होता आत्मदहनाचा इशारा... दरम्यान, अनेक वेळा, निवेदन आणि तक्रारी देऊनही त्याची दखल नगरपालिका प्रशासनाने घेतली नाही. म्हणून दोन दिवसांपूर्वी नरेश भोरे यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. मात्र, तरी देखील नरेश भोरे यांच्या इशाऱ्याकडेही इचलकरंजी नगरपालिका प्रशासनाने दुर्लक्ष केलं. परिणामी भोरे यांनी सोमवारी नगरपालिकेच्या आवारातच स्वतः च्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतलं होतं. सांगली येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना नरेश भोरे यांची प्राणज्योत मालवली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Kolhapur, Maharashtra

पुढील बातम्या