ज्याच्यावर लाखो मुली होत्या फिदा; तो बांगलादेशी हीरो आलोम गजाआड, कारण....

ज्याच्यावर लाखो मुली होत्या फिदा; तो बांगलादेशी हीरो आलोम गजाआड, कारण....

त्याने ढाकामध्ये अजून एक अवैध लग्न केलं आहे. यामुळे तो दिवस- रात्र फोनवर बोलत असतो.

  • Share this:

ढाका, ०८ मार्च- सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकुळ घालणारा बांगलादेशी हीरो अलोम तर साऱ्यांनाच माहीत असेल. हीरो त्याचे लुक्स आणि म्युझिक व्हिडीओमुळे सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्याला पाहून प्रत्येकजण म्हणायचा की, ‘हीरो अलोम- ज्याच्यावर प्रत्येक मुलीचा जीव आहे...’ हा हीरो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी कोणत्या नवीन व्हिडिओसाठी नाही तर गुन्ह्यामुळे चर्चेत आला आहे. हीरोला तुरुंगातही जावं लागू शकतं.

त्याचे झाले असे की, काही दिवसांपूर्वी हीरो अलोमचा (मूळ नाव- अशरफउल हुसैन अलोम) मेहुणा आणि पत्नी साइदा बेगम सूमीने त्याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार नोंदवली होती. यानंतर हीरो अलोमनेही मेहुणा आणि पत्नीविरुद्ध तक्रार केली. यात अलोम म्हणाला की, पत्नी आणि मेहुण्याने अजून तिघांच्या मदतीने त्याचं शोषण केलं आणि घरातून काही पैसे घेऊन पळून गेले.

याप्रकरणी सुरुवातीला पोलिसांनी प्रकरण सामोपचाराने मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना फारसं यश मिळालं नाही. यानंतर हीरो आलोमविरुद्ध पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली आणि त्याला अटकही करण्यात आली.

असं म्हटलं जातं की, हीरो अलोमची पत्नी एका स्थानिक रुग्णालयात उपचार करून घेत होती. ती म्हणाली की, अलोम एक चांगला नवरा नाही, तो कुटुंबाकडे कधीच लक्ष देत नाही. तसेच अलोमचे अनेक अफेअर होते आणि तिला शंका आहे की त्याने ढाकामध्ये अजून एक अवैध लग्न केलं आहे. यामुळे तो दिवस- रात्र फोनवर बोलत असतो. याबद्दल सोमीने त्याला विचारले असता अलोमने तिला मारहाणही केली होती.

VIDEO : अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा आणि सुप्रिया सुळे...कसं आहे नणंद-भावजयमधील बाँडिंग?

First published: March 8, 2019, 5:14 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading