...अन् क्राॅस हॅडशेक करताना डोनाल्ड ट्रम्प झाले कन्फ्यूज !

...अन् क्राॅस हॅडशेक करताना डोनाल्ड ट्रम्प झाले कन्फ्यूज !

एकतेचा संदेश देत त्यांनी एकमेकांना एका वेगळ्याच स्टाईलमध्ये हातमिळवणी केली. या सगळ्यांनी एकमेकांना विरुद्ध हातमिळवणी म्हणजेच (क्रॉस हँडशेक) केलं.

  • Share this:

13 नोव्हेंबर : आसियान परिषदेनिमित्त फिलिपिन्सची राजधानी मनीला इथं अनेक देशांच्या प्रमुखांनी हजेरी लावली आहे. आज या परिषदेला सुरुवात झाली.

याचदरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, चीनचे पंतप्रधान ली केकियांग, जपानचे पंतप्रधान शिंजो आबे आणि इतर नेत व्यासपीठावर गेले. एकतेचा संदेश देत त्यांनी एकमेकांना एका वेगळ्याच स्टाईलमध्ये हातमिळवणी केली. या सगळ्यांनी एकमेकांना विरुद्ध हातमिळवणी म्हणजेच (क्रॉस हँडशेक) केलं.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे नेहमीच त्यांच्या वेगळ्या शैलीमुळे सोशल मीडियावर प्रसिद्ध असतात. आसियान परिषदेतही त्यांची अशीच वेगळी मजेशिर शैली कॅमेऱ्यात कैद झाली. त्यांनी एकमेकांना क्रॉस हातमिळवणी केली आणि त्यात ट्रम्प महाराज भारीच गोंधळून गेलेले दिसले. त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने चेहऱ्याचे हावभाव बदलले. त्यांचे हे गंमतीदार फोटो आणि ती व्हिडिओ सोशल मीडियावर चांगली व्हायरल झाली आहे.

या हातमिळवणीला 'आसियान-वे हँडशेक' असं म्हणतात. यात दोन्ही हातांनी आपल्या डाव्या आणि उजव्या बाजूला उभ्या असणाऱ्या नेत्यांना हात मिळवायचा असतो.

या परिषदेसाठी नरेंद्र मोदी 3 दिवसांच्या मनीला दौऱ्यावर गेले आहेत. आज सकाळी मनीलामधल्या 'राईस फील्ड लॅबोरेटरी'चं मोदींच्या हस्ते उद्घाटन झालं. यादरम्यान, मोदींनी तिथली शेतं पाहिली आणि इतकंच नाही तर त्यांनी शेतात फोवडा देखील चालवला.

Loading...

दुपारी 1 वाजता मोदी आणि ट्रम्प यांची भेट झाली. त्या भेटीत द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा झाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 13, 2017 05:19 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...