'पार्टी विथ डिफरन्स' अशी ओळख असलेल्या भाजपचा बेशिस्तीचे दर्शन घडवणारा VIDEO

'पार्टी विथ डिफरन्स' अशी ओळख असलेल्या भाजपचा बेशिस्तीचे दर्शन घडवणारा VIDEO

'पार्टी विथ डिफरन्स' अशी ओळख असलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी बेशिस्तीचे दर्शन घडवल्याचा एक संतापजनक प्रकार समोर आला आहे.

  • Share this:

जामनेर, 9 जुलै: 'पार्टी विथ डिफरन्स' अशी ओळख असलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी बेशिस्तीचे दर्शन घडवल्याचा एक संतापजनक प्रकार समोर आला आहे.

कोरोनामुळे जमावबंदी आदेश लागू असताना राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांनी रस्त्यावर एकच गर्दी केली होती. हे उतावीळ कार्यकर्ते नुसते गर्दी करून थांबले नाहीत, तर त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत देवेंद्र फडणवीस, आमदार गिरीश महाजन यांच्यासमोर शक्तिप्रदर्शन देखील केलं. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील पहूर येथे हा प्रकार घडला आहे.

हेही वाचा...अँटी व्हायरल औषधी लवकरच राज्यात येणार; आरोग्य मंत्र्यांची मोठी घोषणा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस हे राज्याच्या दौऱ्यावर आहेत. गुरुवारी दुपारी ते जळगावातील दौरा आटोपून औरंगाबादला निघाले होते. फडणवीस रस्त्याने पहूरमार्गे औरंगाबादला जाणार होते. याची माहिती मिळताच माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर तालुक्यातील समर्थकांनी देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी पहूर येथे रस्त्यावर मोठ्या संख्येने गर्दी केली होती. अनेकांनी हातात फडणवीस यांना समर्थन देणाऱ्या घोषणांचे बॅनर घेतले होते.

'पार्टी विथ डिफरन्स' अशी ओळख असलेल्या भाजपचा बेशिस्तीचे दर्शन घडवणारा VIDEO#Devendrafadnavis #BJP #jalgaonbjp #Thepartywithdifference pic.twitter.com/SphTly6V7H

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू आहे, असे असतानाही मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. फडणवीस पहूर येथे पोहचताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या गाडीला गराडा घातला. यावेळी पोलिसांची गर्दीला आवरताना चांगलीच कसरत झाली.

हेही वाचा...'पिंपरी चिंचवडमध्ये जनता कर्फ्यू नको पूर्ण शहरात कडकडीत लॉकडाऊन करा'

देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी प्रचंड गोंधळ घातला केली. यावेळी काही प्रमाणात धक्काबुक्कीही झाली. हा सारा गोंध पाहून फडणवीस स्वागत स्वीकारून पुढे मार्गस्थ झाले.

Published by: Sandip Parolekar
First published: July 9, 2020, 6:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading