Home /News /news /

...म्हणून पुण्यातील मजुरांनी आपल्या गावी जाण्यास दिला नकार; जिल्हाधिकाऱ्यांनी केलं कौतुक

...म्हणून पुण्यातील मजुरांनी आपल्या गावी जाण्यास दिला नकार; जिल्हाधिकाऱ्यांनी केलं कौतुक

अनेक भागांमधून लोक घरी असताना पुण्यातील या एमआयडीसीतील मजुरांना आपल्या गावी जाण्यास नकार दिला आहे

    पुणे, 11 मे : विविध राज्यांमध्ये अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या गावी पोहोचविण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहे. अनेकांना बस तर आता रेल्वेतूनही नागरिकांना गावी जाता येणार आहे. पुण्याहून मध्य प्रदेश आणि उत्तराखंडला जाणारी श्रमिक विशेष रेल्वे सुरू झाल्यानंतरही 380 प्रवासी कामगारांनी रविवारी ट्रेन पकडली नाही. स्थानिक अधिकाऱ्यांनी दावा केला आहे की अनेक भागात पुन्हा उद्योग सुरू झाल्याने परप्रांतीय गावी परतले नाही. एका अधिकाऱ्यांनी सांगितले की, मध्य प्रदेशात जाण्यासाठी 1172 लोकांना परवानगी मिळाली होती. मात्र रेल्वे रवाना होत असताना दौंड स्टेशनवर 300 मजूर पोहोचले नाहीत. यातील अधिकतर एमआयडीसीत (MIDC) काम करणारे होते. दौंडचे तहसीलदार संजय पाटील यांनी सांगितले की, या मजुरांनी गावी जाण्यास नकार दिला आहे. येथील एमआयडीसीमध्ये काम सुरू झाल्याने ते येथे राहून काम करणार आहेत. याशिवाय मजूर त्यांच्या गावी परतल्यामुळे येथील एमआयडीसीमध्ये कंपन्याना त्रास सहन करावा लागू शकतो. यासाठी मजुरांना प्रोत्साहनपर रक्कमही देण्यात आली आहे. यावर पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले की, हा एक सकारात्मक संकेत आहे. एमआयडीसी भागातील उद्योग सुरू करणे आणि गैर निषिद्ध भागांमधील कामांना परवानगी दिल्यामुळे मजुरांमध्ये आशादायी वातावरण आहे. यासाठी ते गावी न जाता येथे राहुन कामाला प्राधान्य देत आहेत. संबंधित - पुणे पालिका अधिकारी मेटाकुटीला; 5 स्टारमधील क्वारंटाईन नागरिकांमुळे उडाली झोप कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने हादरलं केंद्र सरकार, तयार होतोय नवा Action Plan
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या