...म्हणून अजितदादांनी देवेंद्र फडणवीसांसोबत शपथविधी उरकला होता, राष्ट्रवादीच्या नेत्याचा गौप्यस्फोट

...म्हणून अजितदादांनी देवेंद्र फडणवीसांसोबत शपथविधी उरकला होता, राष्ट्रवादीच्या नेत्याचा गौप्यस्फोट

तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडी सरकार स्थापन करावे, याबद्दल अजित पवारांनी साशंकता व्यक्त केली होती.

  • Share this:

मुंबई, 22 ऑगस्ट : शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. सरकार स्थापन होऊन आता सात महिने उलटले आहे. पण, तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडी सरकार स्थापन करावे, याबद्दल अजित पवारांनी साशंकता व्यक्त केली होती. त्यामुळेच महाविकास आघाडीच्या बैठकीतून अजित पवार बाहेर पडले होते, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पेटल यांनी केला.

दैनिक लोकमतला दिलेल्या मुलाखतीत प्रफुल्ल पटेल यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्याबद्दल नेमके काय घडले होते याचा खुलासा केला आहे.  शिवसेना, काँग्रेससोबत सत्ता स्थापन करण्यासाठी अजित पवार हे नाराज होते. त्यावेळी जागा वाटपावरून कमालीची रस्सीखेच सुरू झाली होती. त्यामुळे अजितदादा हे कमालीचे अस्वस्थ झाले होते. त्यामुळे महाविकास आघाडीची बैठक ते अर्ध्यावर सोडून तडकाफडकी बाहेर पडले होते, असा खुलासा प्रफुल्ल पटेल यांनी केला.

'एकीकडे चर्चा सुरू असताना अजितदादांना हे सरकार कसे टिकणार यांची शंका आली. त्यामुळे त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत हातमिळवणी केली आणि शपथविधी उरकून टाकला, असा खुलासाही पटेल यांनी केला. पण, अजितदादांनी भाजपसोबत जाणे योग्य नव्हते, असंही पटेल म्हणाले.

त्यावेळी जे घडले ते घडले. पण, आता महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणताही वाद नाही. सर्व काही सुरळीत चालू आहे. सरकाराचा कारभार हा पद्धतशीरपणे सुरू आहे, असंही पटेल यांनी स्पष्ट केले.

काही दिवसांपूर्वी प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादी ही काँग्रेसचा मोठा भाऊ आहे, असं वक्तव्य केलं होतं. यावर पटेल म्हणाले की, 'माझ्या विधानावर मी ठाम आहे. नागपूरमधून लढण्यास आम्ही ठाम होतो. पण, आधी काँग्रेसने होकार दिला आणि शेवटपर्यंत टाळले होते. आता आमच्याकडे सदस्य जास्त आहे, त्यामुळे आम्ही मोठ्या भावाच्या भूमिकेत आहोत.  माझ्या विधानामुळे कोणताही नाराजी नाही. तिन्ही पक्षासाठी समन्वय समिती आहे, त्यामुळे कोणताही वाद नाही'

पार्थ पवार हे अजित पवार यांचे सुपूत्र जरी असले तरी त्यांची भूमिकाही राष्ट्रवादीची भूमिका नाही. विनाकारण पार्थ यांच्या प्रकरणाला महत्त्व दिले गेले. त्यांच्या ट्वीटरला महत्त्व देण्याचे कारण नव्हते. आमच्याकडून या प्रकरणावर पडदा पडला आहे, असंही पटेल म्हणाले.

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात आदित्य ठाकरे यांचा काडीचाही संबंध नाही. आदित्य ठाकरे हे कधी सुशांत सिंह राजपूतच्या घरी गेले नाही. भेटीकाठी तर दूरचे कारण आहे. आदित्य ठाकरेंना विनाकारण या प्रकरणात गोवले जात आहे, असंही पटेल म्हणाले.

Published by: sachin Salve
First published: August 22, 2020, 11:28 AM IST

ताज्या बातम्या