या घटनेमुळे संपूर्ण सभागृहात खळबळ उडाली आहे. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये अशी जुंपल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. खरंतर कोरोनाच्या संकटामुळे राज्य आणि प्रत्येक नागरिक मेटाकुटीला आला आहे. अशात पालिकेने वेळीच योग्य ते निर्णय घेत आणि कोरोनाचा धोका कसा टाळता येईल यासाठी एकत्र येत काम करणं सामान्य नागरिकांना अपेक्षित आहे. पण प्रकार निवडून दिलेले नेतेच गोंधळ घालत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. मुंबई सोडताच कंगनाचं ट्वीट, 'यावेळी वाचले नाहीतर सोनिया सेनेमुळे मुंबई असुरक्षित कोरोनाच्या या जीवघेण्या संकटात आधीच सगळी व्यवस्था पणाला लागली असताना दुसरीकडे सत्ताधारी आणि विरोधकांचं मात्र पक्षीय राजकारण सुरू असल्याचं दिसतं. एकीकडे राज्यात कंगना आणि शिवसेना असा वाद पेटला असताना दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या स्थगितीनंतर विरोधक पेटून उठले आहेत. त्यात आता कुठेतरी ठाकरे ब्रॅडवरून राजकारणात आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. अशात ड्रग्ज प्रकरणात धक्कादायक खुलास होत असनाता नागरिकांच्या हिताच्या बाबी मात्र लांबच राहिल्याचं दिसतं. त्यामुळे मोठ्या विश्वासाने नेत्यांना आणि अधिकाऱ्यांनी दिलेली जबाबदारी पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन पार पाडावी अशी नागरिकांची इच्छा आहे.सोलापूर महानगरपालिकेच्या सभेत मोठा गोंधळ, आयुक्तांची खुर्ची नगरसेवकांनी पळवली pic.twitter.com/qKyUCjyVEb
— renuka dhaybar (@renu96dhaybar) September 14, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Lockdown