VIDEO : टॉयलेटला गेले अन् कमोडमध्ये बसले होते नागोबा !

VIDEO : टॉयलेटला गेले अन् कमोडमध्ये बसले होते नागोबा !

  • Share this:

भंडारा, 06 जुलै : पावसाळा सुरू झाल्याय...प्रातविधीला जाण्याचा विचार करताय तर थोड़ जपून...राहत्या घराच्या टॉयलेट/कमोडमध्ये चक्क नाग आढळल्याची धक्कायक घटना भंडारा शहराच्या अंबिकानगर भोजापूर येथे घडली आहे. हा नाग spectacled cobra जातीचा असून अत्यंत विषारी असल्याचं बोललं जात आहे. अखेर सर्पमित्राच्या मदतीने त्याला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.

VIDEO: 'तर्राट' तरुणाचा 'झिंगाट' प्रताप, ट्रकच्या धडकेतून बचावला

भंडारा शहराच्या अंबिकानगर, भोजापूर येथील निवासी गुरुदेव सार्वे यांच्या राहत्या घरी टॉयलेट/कमोडमध्ये नाग

आढळला. प्रातविधीसाठी गेले असता त्यांना कमोडमध्ये नाग लपून बसल्याचा आढळला. त्यांनी कमोड तसाच बंद करत टायलेट मध्ये न जाण्याचे सर्वांना सुचित केले. लगेच त्यांनी सर्पमित्रांना फोन करून बोलावून घेतले.

VIDEO : अंगाचा थरकाप उडवणारा अपघात सीसीटीव्हीत कैद

सर्पमित्र राज बघेल यांनी  शिताफीने 1 तासाच्या अथक परिश्रमानंतर त्या विषारी नागाला सुखरूप बाहेर काढून काचेच्या बरणीत जेर बंद केले. हा नाग spectacled cobra जातीचा असून तो अत्यंत विषारी आहे. त्याच्या दंशाने माणसाच्या नर्वस सिस्टमला आघात होऊन लगेच पक्षघाताचा झटका येतो. परिणामी मृत्यू ही ओढावतो. नागाला वनविभागाच्या स्वाधीन करण्यात येणार असून त्याला सुखरूप जंगलात सोडून देण्यात येणार आहे.

 'सेनाभवनावर बाळासाहेबांच्या चरणाशी शिवरायांचा फोटो,मग हा अपमान होत नाही का?'

First published: July 6, 2018, 11:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading