नवी दिल्ली, 18 जुलै : केंद्र सरकारमधल्या कॅबिनेट मंत्री आणि 'क्योंकि सास भी कभी बहू थी या मालिकेतून घराघरांत पोहोचलेल्या स्मृती इराणी यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. त्यांनी रंगवलेल्या तुलसी बहूची व्यक्तिरेखा त्यांनी फेसअॅप वर वापरली आहे. त्यावर या मालिकेची निर्माती एकता कपूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तुम्ही यातही माहीर निघालात, असं एकता कपूर यांनी म्हटलं आहे.
आपण म्हातारं झाल्याचा फोटो शेअर करत स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे, तुम्ही ज्या 'तुलसी' वर प्रेम करता ती तुलसी आज अशी दिसत असेल. त्यांनी मुद्दाम म्हाताऱ्या झालेल्या तुलसीच्या पांढऱ्या केसांचा उल्लेख केला आहे.
यावर या मालिकेची निर्माती असलेल्या एकता कपूर यांनी त्यांची स्तुती केली. फेसअॅपच्या माध्यमातून लोक, ते म्हातारे झाल्यानंतर कसे दिसत असतील याचे फोटो पोस्ट करत आहेत. पण स्मृती इराणी यांनी मात्र हे फेसअॅप वापरून सगळ्यांना तुलसीची आठवण करून दिली.म्हणूनच एकता कपूर स्मृती इराणींवर खूश आहे.
नांदेडमधील 'सैराट'प्रकरणी मुख्य आरोपीला फाशी तर एकाला जन्मठेपची शिक्षा
आपल्या मालिकेचा तिसरा भाग येणार आहे ना? असाही प्रश्न एकता कपूर यांनी विचारला.'क्योंकि सास भी कभी बहू थी' या मालिकेत दोन पिढ्या होत्या. यामध्ये तुलसी ही सून होती. पण आता तुलसी म्हातारी झाली असेल तर निश्चितच पुढच्या भागाची तयारी करायली हवी, असंही एकता कपूर यांनी म्हटलं आहे.
स्मृती इराणी यांचा हा फोटो पाहून एका फॅनने लिहिलं, स्मृती इराणी या सगळ्यात साध्या कॅबिनेट मंत्री आहेत.
स्मृती इराणी यांच्याप्रमाणेच तुम्हीही फेसअॅप चॅलेंज स्वीकारून पाहा, असंही एका फॅनने लिहिलं आहे.
==============================================================================================
कतरिनाच्या फोटोची अर्जुन कपूरने उडवली खिल्ली, मनोरंजन विश्वातील टॉप घडामोडी