News18 Lokmat

स्मृती इराणींचं माहिती आणि प्रसारण खातं काढलं, पियुष गोयलांकडे अर्थमंत्रालयाचा कारभार

केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. अर्थमंत्री अरूण जेटली यांच्याकडचा अर्थमंत्रीपदाचा कार्यभार रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्याकडे तात्परता देण्यात आला आहे.

Ajay Kautikwar | News18 Lokmat | Updated On: May 14, 2018 10:06 PM IST

स्मृती इराणींचं माहिती आणि प्रसारण खातं काढलं, पियुष गोयलांकडे अर्थमंत्रालयाचा कारभार

नवी दिल्ली,ता.14 मे : केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. स्मृती इराणींकडचं महत्वाचं माहिती आणि प्रसारण हे खातं काढून राजवर्धन राठोड यांच्याकडे स्वतंत्र कार्यभार देण्यात आलंय. तर अरूण जेटली यांच्याकडे असलेल्या अर्थखात्याचा कार्यभार रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांच्याकडे देण्यात आला आहे.

अरूण जेटलींवर आजच किडणी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली. त्यामुळं पुढचे काही महिने त्यांना आराम करणं गरजेचं आहे. स्मृती इराणींकडचं महत्वाचं खातं काठून त्यांचे पंख छाटल्याचे हे संकेत मानलं जातंय. केंद्रीय राज्यमंत्री के. जे. अल्फोन्स यांच्याकडे असलेलं ईलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान हे खातं काढण्यात आलं.

एस.एस अहलूवालिया यांना ईलेक्ट्रॉनिक्स या खात्याचा कार्यभार देण्यात आलाय. लोकसभा निवडणूकीला आता केवळ वर्षभराचा कालावधी शिल्लक राहिला. त्या पार्श्वभूमीवर या बदलाला महत्व प्राप्त झालं आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराच्या वादामुळं मोठं वादंग झालं होतं. या प्रकरणात राष्ट्रपतीही ओढले गेल्यामुळं इराणींना हे प्रकरण भोवल्याचं मानलं जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 14, 2018 09:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...