Home /News /news /

Budget 2020 वरून स्मृती इराणींची राहुल गांधींवर खळबळजनक टीका, महिलांवरूनही विचारला थेट प्रश्न

Budget 2020 वरून स्मृती इराणींची राहुल गांधींवर खळबळजनक टीका, महिलांवरूनही विचारला थेट प्रश्न

अर्थसंकल्पात रोजगार निर्मितीसाठी या चारही क्षेत्रांवर विशेष लक्ष दिले गेले आहे. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मोदी सरकारच्या अर्थसंकल्पावर टीका केली, त्यानंतर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी त्यांनी पुन्हा टीकेतून प्रत्युत्तर दिलं आहे.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 02 फेब्रुवारी : शनिवारी अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी देशाचा अर्थसंकल्प (Budget 2020)  सादर केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी या अर्थसंकल्पाला देशाच्या विकासाच्या दिशेने एक यशस्वी पाऊल म्हणून वर्णन केले. दशकातील पहिला अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल आणि विकासाच्या प्रवासानुसार अर्थसंकल्प तयार केल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी अर्थमंत्री आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन केले. पीएम मोदी म्हणाले, 'विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प 2020 मध्ये ऐतिहासिक पावले उचलली गेली आहेत. रोजगार, पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान आणि कापड हे रोजगाराचे महत्त्वाचे क्षेत्र आहेत. अर्थसंकल्पात रोजगार निर्मितीसाठी या चारही क्षेत्रांवर विशेष लक्ष दिले गेले आहे. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मोदी सरकारच्या अर्थसंकल्पावर टीका केली, त्यानंतर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी त्यांनी पुन्हा टीकेतून प्रत्युत्तर दिलं आहे. राहुल गांधींच्या अर्थसंकल्पावरील प्रतिक्रिया याबद्दल जेव्हा स्मृती इराणी यांना विचारले गेले तेव्हा त्या म्हणाल्या की, 'मी त्यांच्यासमोर बसले होते. अर्ध्या बजेट भाषण दरम्यान ते डोळे मिटून बसले होते. आर्थिक मुद्द्यांवरील घोषणेदरम्यान ते बाहेर गेले होते. अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान जेव्हा निर्मला जी अस्वस्थ झाल्या तेव्हा ते गॅलरीत हसत होते. जर एखादी महिली अस्वस्थ असेल तर त्यावर तुम्ही हसत बसणार का ? त्यामुळे राहुल गांधींना बजेट समजलं आहे का?' अशा शब्दात स्मृती इराणी यांनी राहुल गांधींवर टीका केली. इतर बातम्या - गड किल्ल्यांवर दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्यांची आता थेट जेलवारी, सरकारचा नवा आदेश 'अर्थव्यवस्थेला लवकरच अच्छे दिन', निर्मला सीतारामन यांची नेटवर्क 18 ला खास मुलाखत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केंद्रीय अर्थसंकल्प मांडला. यानंतर नेटवर्क 18 चे एडिटर इन चीफ राहुल जोशी यांनी त्यांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत घेतली. आम्ही रोजगार आणि गुंतवणुकीवर भर दिला आहे, असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. अर्थव्यवस्थेला चालना देणं गरजेचं आहे. त्यासाठी मागणी आणि पुरवठा वाढवणं हे आमचं उद्दिष्ट आहे. कॉर्पोरेट टॅक्समध्ये कपात केल्यामुळे देशात खाजगी गुंतवणुकीला चालना मिळाली, असंही त्या म्हणाल्या. आम्ही इनकम टॅक्समध्ये सवलत दिली. सामान्यांचा वाचलेला पैसा गुंतवणुकीत जाणं गरजेचं आहे, असं त्यांनी सांगितलं. करप्रणाली साधीसोपी करणं हे आमचं उद्दिष्ट आहे. त्याचबरोबर परदेशी गुंतवणूकदार भारतात गुंतवणूक करण्याबद्दल उत्सुक आहेत याकडेही त्यांनी लक्ष वेधलं. या अर्थसंकल्पात कृषी आणि ग्रामीण विकासासाठी भरीव निधी देण्यात आलाय. आरोग्य, शिक्षण आणि रोजगारांवर भर दिला आहे, असं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. पायाभूत संरचनेवर भर देण्यासाठी या सुविधांमध्ये 100 लाख कोटी गुंतवणार असल्याचंही त्या म्हणाल्या. वित्तीय तुटीमुळे भारताचं रेटिंग कमी होणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. इतर बातम्या - महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का, सोलापूरच्या महास्वामींची खासदारकी धोक्यात? सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनांचा भारतातल्या बिझनेसवर परिणाम होणार नाही. यामुळे भारताची प्रतिमा आंतरराष्ट्रीय पातळीवर डागाळली जाणार नाही. CAA हा नागरिकत्व देणारा कायदा आहे, नागरिकत्व काढून घेणार नाही, असंही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं.
    Published by:Renuka Dhaybar
    First published:

    Tags: Budget 2020

    पुढील बातम्या