आई स्मिता पाटीलसाठी प्रतिकने केलं मराठमोळ्या पद्धतीने लग्न

लग्नासारख्या आयुष्यातील महत्त्वाच्या क्षणी प्रतीकने आईच्या आठवणीत मराठमोळ्या पद्धतीने लग्न केलं.

  • Share this:

स्मिता पाटील आणि राज बब्बर यांचा मुलगा प्रतीक बब्बरने प्रेयसी सान्या सागरसोबत मराठमोळ्या पद्धतीत लघनऊमध्ये लग्न केलं.

३२ वर्षांच्या प्रतिकने आई स्मिता पाटीलच्या आठवणीत मराठी पद्धतीने लग्न केलं. हळदीपासून ते लग्नापर्यंत सर्व विधा मराठी पद्धतीने पार पाडल्या गेल्या.

यावेळी प्रतीकसोबत वडील राज बब्बर, राजच्या पत्नी नादिरा बब्बर, भाई आर्य बब्बर बहिण जुही बब्बर, मेव्हणे अनूप सोनीसह कुटुंबातील अन्य मंडळी उपस्थित होती.

प्रतीकच्या जन्माच्या काही दिवसांमध्येच स्मिता पाटील यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे लहानपणापासून तो आईच्या प्रेमाला पोरकाच राहिला.

स्मिता यांच्या आई- बाबांनी पुढे प्रतीकचा सांभाळ केला. मात्र लग्नासारख्या आयुष्यातील महत्त्वाच्या क्षणी प्रतीकने आईच्या आठवणीत मराठमोळ्या पद्धतीने लग्न केलं.

लग्नावेळी प्रतीकने क्रिम रंगाचा कुर्ता आणि पायजमा घातला होता. तर सान्याने पिवळ्या रंगाची साडी नेसली होती तर लाल रंगाचा शेला घेतला होता.

सर्व विधींवेळी प्रतीकनेही लाल रंगाचं उपरणं गळ्यात घातलं होतं. इतर कुटुंबीयही मराठमोळ्या पद्धतीने नटले होते.

गेल्या १० वर्षांपासून प्रतीक आणि सान्या एकमेकांना ओळखत आहेत. प्रतिकने सान्याला २०१६ मध्ये गोव्यात प्रपोज केलं होत. लखनऊमध्ये गौमती नगर येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांचं लग्न झालं.

प्रतीकने सान्यासोबत नात्याची सुरुवात एका वन नाइट स्टँडने झाल्याचं एक मुलाखतीत म्हटलं होतं. पण, नंतर भेटी वाढत गेल्या आणि आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो. आमच्या दोघांमध्ये अनेक गोष्टींचं साम्य आहे.

प्रतीक आणि सान्याने एक वर्षापूर्वी साखरपुडा केला होता. दोघं अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत असल्यामुळे दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

मीडिया रिपोर्टनुसार लग्नानंतर दोघंही मुंबईत मोठं रिसेप्शन ठेवणार आहेत. यावेळी बॉलिवूडपासून राजकारणापर्यंत अनेक व्यक्ती नवीन जोडप्याला आशीर्वाद देण्यासाठी येतील.

राज बब्बर सुरुवातीपासूनच उत्तर प्रदेशमधील राजकारणात सक्रीय आहेत. यामुळे ते जास्तकरून लखनऊमध्येच राहतात.

याच कारणामुळे प्रतीकचं लग्नही लखनऊमध्येच होत आहे. आपल्या लग्नाबद्दल बोलताना एका मुलाखतीत प्रतीक म्हणाला की, ‘सान्या आणि माझ्या कुटुंबाने हे पक्क केलं होतं की आमचं लग्न वसंत पंचमीला झालं पाहिजे. यामुळे आम्ही लग्न त्याच दिवशी करत आहोत.’

प्रतीक म्हणाला की, ‘या क्षणाला मी फार आनंदी आहे. मला जसा पार्टनर हवा होता सान्या अगदी तशीच आहे. ती माझ्यासाठीच बनली आहे हे जाणून घ्यायला मला जास्त वेळ लागला नाही.’

प्रतीकचे वडील राज बब्बर अभिनेता असले तरी ते आता राजकारणात सक्रीय आहेत तसेच सान्याचे वडील पवन सागरही एक राजकीय नेते आहेत.

राज काँग्रेस नेते आहेत तर पवन सागर बहुजन समाज पार्टीचे नेते आहेत. मायावतींचे ते निकटवर्तीय आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 25, 2019 11:56 AM IST

ताज्या बातम्या