नवी दिल्ली, 07 मार्च : स्मार्टफोनच्या जमान्यात डेटा सुरक्षितता धोक्यात आली आहे. आता पुन्हा एकदा युजर्ससाठी मोठा धोका समोर आला असून सायबर सिक्युरीटी फर्म Which? ने 100 कोटींपेक्षा जास्त युजर्सचा पर्सनल डेटा हॅकर्सच्या निशाण्यावर असल्याचं म्हटलं आहे. गुगलकडून सध्या पाच पैकी दोन अँड्रॉइड स्मार्टफोन्सना अपडेट देत नाही. त्यामुळे युजर्सचा डेटा चोरी होण्याची शक्यता वाढली आहे.
अँड्रॉइड डिव्हाइसला हॅकर्सपासून वाचवण्यासाठी गुगलकडून सतत अपडेट दिले जातात पण जुन्या स्मार्टफोनवर आता हे अपडेट दिले जात नाहीत. यामुळे युजर्सच्या डेटासाठी धोक्याचा इशारा आहे. काही स्मार्टफोन्स आणि टॅबची चाचणी लॅबमध्ये करण्यात आली. त्यात असे टॅब आणि स्मार्टफोन हॅक करता येतात हे समोर आलं आहे.
कंपनीने चेक केलेल्या जुन्या स्मार्टफोन्समध्ये गुगल, एलजी, मोटोरोला, सॅमसंग आणि सोनीच्या डिव्हाइसचा समावेश होता. यात धक्कादायक गोष्ट म्हणजे अजुनही जुने स्मार्टफोन ऑनलाइन खरेदासाठी उपलब्ध आहेत. सायबर अटॅकचा धोका त्या युजर्सना जास्त आहे ज्यांच्याकडे 2012 च्या आधी लाँच झालेले अँड्रॉइड डिव्हाइस आहेत.
तुमचा स्मार्टफोन कधी लाँच घेतला आहे आणि त्याचे लास्ट अपडेट कधी आलं आहे याची माहिती डिव्हाइसवर मिळते. तुम्ही लेटेस्ट फोन वापरत असलात तरी त्यात अँड्रॉइड व्हर्जन अपडेट केलं आहे का? काही अपडेट आलेत का हे चेक करा. त्यासाठी सेटिंगमध्ये जाऊन सिस्टिम अपडेट मध्ये चेक करा. तिथं तुम्हाला शेवटचे अपडेट आणि लेटेस्ट अपडेट आले असेल तर त्याची माहिती मिळते. प्रत्येक डिव्हाइसनुसार सेटिंगमध्ये त्यासाठी वेगवेगळे पर्याय असतात.
हे वाचा : WhatsApp च्या या ट्रिक्स फोन मेमरी वाचवतील आणि चॅटसुद्धा करता येईल सेव्ह
अँड्रॉइडच्या डेटा सुरक्षेवरून अनेक प्रश्न उपस्थित होत असताना गुगलकडून सांगण्यात आलं की, आम्ही दररोज अँड्रॉइड डिव्हाइसच्या सुरक्षेला मजबूत करण्यासाठी काम करत आहे. दर महिन्यात आवश्यक ते अपडेट देण्याचा प्रयत्न असतो. यासाठी आम्ही हार्डवेअर आणि करिअर पार्टनर्ससोबतही अँड्रॉइड युजर्सच्या दृष्टीने काही बदल करता येतात का यावर चर्चा करतो असंही त्यांनी सांगितलं.
हे वाचा : सावधान! तुमच्या Whatsapp ची माहिती होऊ शकते लीक, Whatsapp वापरताना 'हे' टाळा