‘आई कोरोनाची गाडी आली’ आणि पालकांना फुटले रडू

‘आई कोरोनाची गाडी आली’ आणि पालकांना फुटले रडू

शहरातील पुंडलिक नगर भागात काही लहान मुलांमध्ये कोरोनाची लक्षण आढळून आली. त्यामुळे मुलांच्या पालकांच्या काळजाचा ठोका चुकला.

  • Share this:

औरंगाबाद, 20 मे : औरंगाबादमध्ये कॊरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1000 पेक्षा जास्त झाली आहे. या रुग्णांमध्ये 1 ते 8 वर्षांच्या लहान मुलांचा देखिल समावेश आहे.

शहरातील पुंडलिक नगर भागातही काही लहान मुलांमध्ये कोरोनाची लक्षण आढळून आली. त्यामुळे पाॅझिटिव्ह मुलांच्या पालकांच्या काळजाचा ठोका चुकला. त्यांना माहीत होतं आपल्याला आता पुढचे काही दिवस मुलांच्या सोबत राहता येणार नाही. पालकांनी आपापल्या बालकांच्या बॅग भरायला सुरुवात केली. काहीही न कळण्याच्या वयात बालकांना काही कळत नव्हते कॊरोना काय आहे ?आपल्याला नेमकं झालं काय? आपल्याला कुठं नेणार? असे अनेक प्रश्न मुलांच्या चेहऱ्यावर होते. आपल्या पालकांचे चिंताग्रस्त चेहरे बघून मुलंही रडू लागली.

शेवटी पुंडलिकनगरमध्ये पांढरे किट घालून आरोग्य विभागाचे कर्मचारी हातात कॊरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची लिस्ट घेऊन आले. कॊरोना पाॅझिटिव्ह मुलांना घेऊन त्यांचे पालक रांगेत लागले. तेवढ्यात रुग्णांना घेऊन जाणारी बस आली आणि पालकांच्या डोळ्यात असावं आली.

आरोग्य विभागाचे कर्मचारी लिस्ट वाचून एकएकला गाडीमध्ये बसवू लागले. शेवटी पालकांनी मन घट्ट करून भरलेल्या बॅग सहित आपापल्या मुलांना गाडीत बसवले.निष्पाप मुलांना बॅग घेऊन गाडीत चढतांना बघून उपस्थित गल्लीतील नागरिकांना भावना अनावर झाल्या अनेकांनी आपल्या भावना वाट मोकळी करून दिली.

शेवटी उपस्थित पोलीस आणि आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सगळ्यांना धीर देत म्हटलं ‘कोरोनातून अनेक जण आता बरे होऊन घरी जात आहेत. त्यामुळे घाबरू नका तुमची मुलं नक्की बरे होऊन परत येतील. आम्हालाही मुलं आहेत आम्ही त्यांची काळजी घेऊ, कर्मचारी सगळ्यांना धीर देत असले तरी त्यांच्या पाणावलेल्या डोळ्याच्या कडा ओला झाला.

First published: May 20, 2020, 11:29 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading