मुंबई, 2 जुलै : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी मध्य रेल्वेने दिली आहे. मध्य रेल्वे
(Central Railway) मुख्यालय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे राहण्यासाठी स्लीपिंग पॉड्स सेवा
(Sleeping Pods Service) सुरू होणार आहे. मुंबई विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, या जुलैपासून स्लीपिंग पॉड्स सुरू होणार आहेत. उल्लेखनीय आहे की, गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल स्थानकावर
(Mumbai Central Station) स्लीपिंग पॉड्स सेवा सुरू करण्यात आली होती.
सीएसएमटी स्लीपिंग पॉड्सची निर्मिती आणि संचालनाची जबाबदारी नमह एंटरप्रायझेसला देण्यात आली आहे. यासाठी, कंपनी परवाना शुल्क म्हणून दरवर्षी 10,07,786/ भरणार आहे. रेल्वेला पाच वर्षांच्या कालावधीसाठी 55.68 लाख रुपये मिळतील. करारानुसार, परवानाधारक
CSMT येथे 131.61 चौरस मीटर क्षेत्रफळावर प्रवाशांसाठी पॉड विकसित करेल. मध्य रेल्वेने नॉन फेअर रेव्हेन्यूच्या माध्यमातून नवीन उपक्रम आणले आहेत. याचा प्रवाशांना फायदा होत असून रेल्वेला महसूलही मिळत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकावरील पॉड हॉटेल
(NINFRIS) नवीन नाविन्यपूर्ण नॉन-फेअर महसूल उत्पन्न योजनेअंतर्गत विकसित केले जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाच्या मुख्य मार्गावरील प्रतीक्षालयाजवळ असलेल्या
CSMT, मुंबई येथे प्रवाशांना अधिक आरामदायी, परवडणारा आणि स्वस्त मुक्कामाचा पर्याय देण्यासाठी हे खुले करण्यात आले आहे. एकूण 40 पॉड आहेत, ज्यात 30 सिंगल पॉड, 6 दुहेरी पॉड आणि 4 फॅमिली पॉड आहेत. या उत्तम वातानुकूलित निवास पॉड हॉटेलमध्ये संपूर्ण गोपनीयता, मोबाइल चार्जिंग सुविधा, लॉकर रूम सुविधा, फायर अलार्म, इंटरकॉम, डिलक्स टॉयलेट आणि बाथरूम इ. या पॉड्सचे बुकिंग फिजिकल मोड (रिसेप्शनवर) आणि ऑनलाइन मोडद्वारे मोबाईल अॅपच्या माध्यमातून केले जाऊ शकते.
चांगली नोकरी सोडून मुलगी करतीये भटकंती; व्हॅनलाच बनवलंय घर, जाणून घ्या कहाणी
2021-22 या आर्थिक वर्षात नॉन-फेअर महसूल निर्मितीमध्ये सर्व विभागीय रेल्वेंमध्ये प्रथम क्रमांक मिळविलेल्या मध्य रेल्वेने या वर्षी पहिल्या तीन महिन्यांत, म्हणजे एप्रिल ते जून 2022 या कालावधीत
NFR द्वारे नवीन उपक्रम आणले आहेत. एप्रिल ते जून 2021 या कालावधीत 1.89 कोटी रुपयांच्या तुलनेत 14.10 कोटी, 646% ची अविश्वसनीय वाढ दर्शवते. प्रवाशांना अधिक आराम देण्यासाठी हायब्रिड
OBHS कॉन्ट्रॅक्ट्स, डिजिलॉकर्स, पर्सनल केअर सेंटर्स, ई-बाईक, ई-चार्जिंग पॉइंट्स, कंटेंट ऑन डिमांड, कॉन्व्हर्सेशन ऑन द मूव्ह इत्यादी विविध नॉन-फेअर रेव्हेन्यू संकल्पना सुरू करण्यात आल्या आहेत. नॉन-फेअर रेव्हेन्यू अंतर्गत असे आणखी बरेच उपक्रम घेतले जात आहेत ज्यामुळे प्रवाशांना फायदा होईल आणि रेल्वेला महसूलही मिळेल. असाच उपक्रम IRCTC ने गेल्या वर्षी मुंबई सेंट्रल, पश्चिम रेल्वे येथे सुरू केला होता.
स्लीपिंग पॉड्समध्ये काय सुविधा मिळतात?
स्लीपिंग पॉड्स संकल्पना पहिल्यांदा जपानमध्ये सुरू झाली, ती आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगलीच पसंत केली जाते. ज्यामध्ये प्रवाशांना महागड्या हॉटेल्सपेक्षा कमी दरात 12 ते 24 तास राहण्याची सोय मिळते. स्लीपिंग पॉड्स सेवेचा सर्वात मोठा फायदा त्या प्रवाशांना होईल जे लांबच्या प्रवासानंतर स्टेशनवर थांबतात किंवा जे ट्रेन पकडण्यासाठी स्टेशनवर थांबतात.
कॅप्सूल आकाराचे बेड
स्लीपिंग पॉड्स सेवेमध्ये रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी, कॅप्सूलच्या आकारात बेड दिले जातात. या विशेष संकल्पनेद्वारे लोकांना रेल्वे स्थानकावर शांतपणे झोपता येणार आहे, त्यांना त्यांची महत्त्वाची कामे पॉड्सच्या आत करता येणार आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.