महाराष्ट्रातील 'या' भागात पावसाचा जोर वाढणार, मुंबईला मात्र रामराम

महाराष्ट्रातील 'या' भागात पावसाचा जोर वाढणार, मुंबईला मात्र रामराम

मुंबईत गेल्या 2 आठवड्यांपासून पावसाने दडी मारली आहे. असं असलं तरी उपनररांमध्ये हलक्या स्वरुपाचा पाऊस आहे.

  • Share this:

मुंबई, 22 ऑगस्ट : आगामी काळात महाराष्ट्रामध्ये चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाज स्कायमेटकडून वर्तवण्यात आला आहे. पुढच्या 2 दिवसामध्ये विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर वाढणार असल्याचं स्कायमेटनं म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये अनेक भागांत पावसाने विश्रांती घेतल्याचं पाहायला मिळालं. मुंबईतही पावसाने विश्रांती घेतली आहे. पण पुढच्या काही दिवसांत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या भागांमध्ये पावसाचा जोर चांगला राहिल असं हवामान खात्यानं म्हटलं आहे.

मराठवाड्यामध्ये गुरुवारी म्हणजे आज मध्यम सरींची शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे. मुंबईत गेल्या 2 आठवड्यांपासून पावसाने दडी मारली आहे. असं असलं तरी उपनररांमध्ये हलक्या स्वरुपाचा पाऊस आहे. गुरुवारी आणि शुक्रवारी मुंबईत रिमझिप पाऊस असेल असं स्कायमेटनं म्हटलं आहे. तर दुसरीकडे मुंबईत पावसाचा जोर कमी झाल्यामुळे तापमानात वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे मुंबईकरांना गरमीचा सामना करावा लागत आहे.

भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये सामान्य किंवा चांगला पाऊस झाला आहे. तर यंदा झालेल्या पावसामुळे मराठवाड्यामध्ये 24 टक्के पावसाची कमतरता आहे. जुलै महिन्याच्या शेवटी आणि ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या 10 दिवसांमध्ये महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली. त्यामुळे अनेक भागांमध्ये पुरांचा सामना करावा लागला. कोल्हापूर आणि सांगलीमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाल्यामुळे नागरिकांचं मोठं नुकसान झालं. संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं.

हेही वाचा: 'ठाकरे म्हणजे मराठी माणसाची अस्मिता', जितेंद्र आव्हाडांची आक्रमक प्रतिक्रिया

दरम्यान, ऑगस्ट महिन्यामध्ये झालेल्या पावसामुळे मध्य महाराष्ट्राला फायदा झाला असल्याचं अभ्यासकांचं म्हणणं आहे. सगळी धरणं, तलावं आणि नद्या दुथडी भरून वाहत असल्यामुळे अनेक गावांचा पाणी प्रश्न सुटला आहे. या पावसामुळे मराठवाड्यातली पाणी कमतरता कमी होईल.

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, येत्या 24 तासांतमध्ये  विदर्भ, कोकण, गोव्यात हलका ते मध्यम पाऊस पडणार आहे. तर मध्य महाराष्ट्रात हलका ते मध्यम अशा पावसाने हजेरी लावली आहे. 23 ऑगस्टपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होणार होईल. तर आगामी काळात चांगला पाऊस असं हवामान विभागाचा अंदाज आहे.  विदर्भ, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

मुलाच्या अंगावरून गाडी गेली पण खरचटलंही नाही, श्वास रोखून धरायला लावणारा VIDEO समोर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 22, 2019 03:59 PM IST

ताज्या बातम्या