OMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड!

OMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड!

कुत्रा चावल्यानं कुत्र्याच्या मालकाला सांगली जिल्हा न्यायालयानं सहा हजाराचा दंड ठोठावलाय. दंड न भरल्यास एक महिन्यांची साधी कैद अशी शिक्षा ठोठावलीये.

  • Share this:

सांगली, 19 ऑगस्ट : कुत्रा पाळणं आता तुम्हाला महागात पडू शकतं. कारण कुत्रा चावल्यानं कुत्र्याच्या मालकाला सांगली जिल्हा न्यायालयानं सहा हजाराचा दंड ठोठावलाय. दंड न भरल्यास एक महिन्यांची साधी कैद अशी शिक्षा ठोठावलीये. कुत्रा चावल्यानंतर पहिल्यांदाच अशा प्रकारची शिक्षा सुनावण्यात आलीये. सांगलीमध्ये एका कुत्र्याच्या मालकाला त्याच्या कुत्र्याचे चावणे आणि त्यानंतर जखमींसोबत उद्धट बोलणे चांगेलच महागात पडले आहे. याप्रकरणी सांगली जिल्हा न्यायालयाने कुत्र्याच्या मालकाला शिक्षा सुनावली आहे.

एप्रिल २०१५ साली सांगलीच्या वारणाली येथे सायकलवरून जाणाऱ्या बँक कर्मचारी भिमाशंकर तारापुरे यांच्या पायाला एका कुत्र्याने चावा घेतला. यानंतर त्याच कुत्र्याने आणखी चौघांना चावा घेत तारापूरे यांच्यासह पाच जणांना जखमी केले. त्यानंतर त्यांनी कुत्र्याचे मालक विठ्ठल महादेव साखरे आणि गोविंद महादेव साखरे यांना जाब विचारला असता, त्यांनी सर्वांनां उद्धट उत्तरे दिली. याचा राग अनावर झाल्याने भिमाशंकर तारापुरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून विश्रामबाग पोलीस ठाण्यात साखरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. आज या खटल्यामध्ये सांगली जिल्हा न्यायालयाने ६ साक्षीदारांच्या तपासात विठ्ठल महादेव साखरे आणि गोविंद महादेव साखरे यांना दोषी ठरवत, दोन वेगवेगळ्या कलमांतर्गत ६ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास १ महिने साधी कैद अशी शिक्षा ठोठावली. कुत्रा चावल्यानंतर पहिल्यांदाच अशा प्रकारची शिक्षा सुनावण्यात आली असल्यामुळे दंड सोसण्याची एपत असेल तरच कुत्रा पाळा असे म्हणण्याची आता वेळ आली आहे.

First published: August 19, 2018, 9:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading