देवासारखे धावून आले डॉक्टर, 6 महिन्याच्या चिमुकल्याच्या गळ्यातून काढली विक्सची डबी

देवासारखे धावून आले डॉक्टर, 6 महिन्याच्या चिमुकल्याच्या गळ्यातून काढली विक्सची डबी

इगतपुरी तालुक्यातील निलेश संदिप केकरे या 6 महिन्याच्या चिमुकल्याने विक्सची डब्बी गिळली.

  • Share this:

प्रशांत बाग, प्रतिनिधी

इगतपूरी, 19 मार्च : एक रुपयाचं नाणं लहान मुलांच्या गळ्यात अडकल्याचं तुम्ही ऐकलं असेल पण 6 महिन्याच्या बाळाच्या गळ्यात विस्कची डबी अडकल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये घडला आहे. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांमुळे बाळाला जीवनदान मिळालं आहे.

इगतपुरी तालुक्यातील निलेश संदिप केकरे या 6 महिन्याच्या चिमुकल्याने विक्सची डब्बी गिळली. ती त्याच्या गळ्यात अडकली. त्याच्या कुटुंबीयांनी त्याला तात्काळ नाशिकच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल केलं. यावेळी डॉक्टरांनी तात्काळ निलेशवर शस्त्रक्रिया केरून त्याचा जीव वाचवण्यात आला आहे. त्यामुळे देवाच्या रुपात डॉक्टर्स धावून आले असंच म्हणावं लागेल.

विक्सची डबी गळ्यात अडकल्यामुळे ती बाहेर काढणं हे मोठं आव्हान सिव्हिलच्या डॉक्टरांसमोर होतं. डॉ संजय गांगुर्डे यांनी तत्काळ ऑपरेशनचा निर्णय घेतला. सलग दीड तास ऑपरेशन करून विक्सची डबी बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आलं आहे.

डॉ. गांगुर्डे यांच्यासह डॉ. दीपाली चौधरी, डॉ. तडवी, डॉ. पटेल यांनी ही सर्जरी केली आहे. तर सिव्हीलच्या OT सिस्टर मोरे, ब्रदर अहिरे यांच्या सहकार्यामुळे बाळाचे प्राण वाचले आहेत. याच पथकांनं नाणं गिळलेल्या 5 लहान मुलांना आतापर्यंत जीवदान दिलं आहे.

बाळाला असं काही झाल्यामुळे केकरे कुटुंबीय घाबरे होते. पण डॉक्टरांच्या या प्रयत्नांमुळे त्यांनी डॉक्टरांचे आभार मानले आहेत.

VIDEO: लज्जास्पद ! पुण्यात तरुणीचा विनयभंग, घटना सीसीटीव्हीत कैद

First published: March 19, 2019, 7:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading