• Home
  • »
  • News
  • »
  • news
  • »
  • ‘ज्ञानेश्वर मुळे हे मातीशी नाळ कायम ठेवत आकाशाला गवसणी घालणारे लेखक’

‘ज्ञानेश्वर मुळे हे मातीशी नाळ कायम ठेवत आकाशाला गवसणी घालणारे लेखक’

सर्जनशील लेखक आणि परराष्ट्र मंत्रालयातले सचिव ज्ञानेश्वर मुळे यांच्या सहा पुस्तकांचं प्रकाशनाचं नुकतचं पुण्यात झालं. महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेतर्फे ही पुस्तकं प्रकाशीत करण्यात आली आहेत. या कार्यक्रमात बोलताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी ज्ञानेश्वर मुळे यांच्या कामाचं कौतुक करत गौरवोद्गार काढले.

  • Share this:
पुणे,03 एप्रिल : आपल्या मातीशी नाळ कायम ठेवत आकाशाला गवसणी घालणारी माणसं दुर्मिळ असतात. कितीही कठीण परिस्थिती असली तर आपल्या सामर्थ्याच्या जोरावर आकाशाला गवसणी घालता येते हे ज्ञानेश्वर मुळे यांनी दाखवून दिले असे गौरवोद्गार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी काढले. निमित्त होतं सर्जनशील लेखक आणि परराष्ट्र मंत्रालयातले सचिव ज्ञानेश्वर मुळे यांच्या सहा पुस्तकांच्या प्रकाशनाचं. पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या एका कार्यक्रमात नुकतंच या पुस्तकांचं प्रकाशन करण्यात आलं. महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेतर्फे ही पुस्तकं प्रकाशीत करण्यात आली आहेत. प्रशासनात राहिल्यानंतर माणसं रूक्ष होतात, त्यांच्यात सर्जनशीलता राहत नाही असा समज असताना ज्ञानेश्वर मुळे यांची जगभरातल्या अनुभवांवर, संस्कृतीवर आधारित ही पुस्तकं आणि कविता संग्रह आहेत. त्यांनी रशिया, जपान,अमेरिका, सीरिया, मालदीव अशा विविध देशांमध्ये राजदूत म्हणून प्रभावी काम केलंय. तिथले अनुभव, भारतीय संस्कृती यांचं दर्शन त्यांच्या लिखाणामधून दिसते.  माती पंख आणि आकाश, सायलेंट केऑस, अँड दी जिप्सी लर्न्ड टू फ्लाय, पासपोर्ट मॅन ऑफ इंडिया, शांती की अफवाएँ, सकाळ..जी होत नाही, श्रीराधा, ज्ञानेश्वर मुळे की कविताएँ  ही मुळे यांनी लिहिलेली पुस्तके या वेळी मोहन भागवत यांच्या हस्ते प्रकाशित झाली. कार्यक्रमाला स्ट्रॅटेजिक फोरसाईट ग्रुप’चे अध्यक्ष संदीप वासलेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.     
First published: