बहिणीची शेजारच्या मित्रासोबत सुरू होती Love Story, भावाला समजताच प्रियकराची अशी लावली वाट!

प्रेम केल्याची मोठी शिक्षा या प्रेयसी आणि प्रियकराला भोगावी लागली आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 2, 2019 09:18 AM IST

बहिणीची शेजारच्या मित्रासोबत सुरू होती Love Story, भावाला समजताच प्रियकराची अशी लावली वाट!

छत्तीसगड, 02 सप्टेंबर : प्रेम प्रकरणातून गुन्हा होण्याचं प्रमाण वाढलं आहे. प्रेम केल्याची मोठी किम्मत एका जोडप्याला चुकवावी लागली आहे. बहिणीचं प्रेम प्रकरण घरी समजल्यानंतर कुटुंबीयांना राग अनावर झाला आणि त्यांनी टोकाचं पाऊल उचललं. कुटुंबीयांनी फक्त प्रेमी युगुलाला एकमेकांपासून वेगळं तर केलंच पण त्यांनी केलेल्या प्रकारामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी रायपूरच्या डीडी नगर पोलिसांनी रविवारी तरुणीच्या कुटुंबीयांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. तर पीडित तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. बहिणीसोबत प्रेम प्रकरण ठेवल्यामुळे रागात भावाने तरुणाला बेदम मारहाण केली आणि त्याला जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचं सांगण्यात येत आहे.

हा सगळा धक्कादायक प्रकार छत्तीसगडमध्ये घडला आहे. डीडी नगर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रायपूरच्या चांगोराभाठा इथे राहणाऱ्या देवगन ध्रुवचं घराजवळ राहणाऱ्या युवतीशी प्रेमसंबंध होते. मुलीच्या कुटूंबाला हे कळताच त्यांनी मुलीला फूफाकडे राहण्यासाठी पाठवलं. पण संधी मिळताच मुलगी रायपूरला आली आणि मुलाला भेटली.

आज मुलगी तिचा प्रियकर देवगन ध्रुवसमवेत अग्रोहा कॉलनीत होती. दरम्यान, त्याचे नातेवाईक तेथे पोहोचले आणि या दोघांचे अपहरण केले आणि त्या युवकाला जोरदार मारहाण केली. एवढेच नाही तर जिवे मारण्याची धमकीही दिली. प्रेयसी आणि प्रियकर एका कॉलोनीमध्ये राहत होते. तरुणीच्या कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला आणि त्यानंतर जे झालं ते धक्कादायक होतं.

इतर बातम्या - शाळेतच सुरू होते मुख्याधापकांचे शिक्षिकांसोबत अश्लील चाळे, PHOTOS व्हायरल

Loading...

तरुणीचे कुटुंबीयांनी रंगे हात युगुलाला घरात पकडलं. त्यानंतर तरुणीच्या भावाने तिला बाहेर पाठवलं आणि तरुणाची बेदम मारहाण केली. त्याला वेळीच थांबवलं नसतं तर पीडित प्रियकराचा जीव गेला असता अशी माहिती पोलिसांनी दिली.

इतर बातम्या  - भारताला आणखी एक यश, कुलभूषण यांना आज मिळणार दुतावासाची मदत

नातेवाईक आहेत सर्व आरोपी...

रायपूरचे सिटी एएसपी प्रफुल्ल ठाकूर यांनी सांगितले की, डीडी नगर पोलिसांनी याप्रकरणी अपहरण करणाऱ्या 6 आरोपींना अटक केली आहे. यात मुलीचे काका संतोष सेन, भाऊ योगराज सेन, मुलीचे मामा मोनू सेन आणि तिचे शेजारी रमझान खान आणि राधेश्याम यदु यांचा समावेश आहे. पीडित मुलीने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, कुटुंबीयांनी तरूणांचं अपहरण केलं आणि जोरदार मारहाण केली आणि त्याला ओलिस ठेवले. या प्रकरणाची माहिती मिळताच डीडी नगर पोलिसांनी त्या युवकाची सुटका करून सर्व आरोपींना अटक केली.

Ganesh Chaturthi 2019: पहिल्याच दिवशी लालबागच्या राजाला भक्तांची अलोट गर्दी, पाहा LIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 2, 2019 09:18 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...